![]()
विद्यार्थ्यांना रस्त्यावर मारहाण झाल्याच्या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह संसदेत फिरकले नसून ते गायब असल्याचा आरोप करत विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मात्र विरोधकांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शाह यांची पाठराखण केली असून, अमितभाई बोलतील तेव्हा हे पळून जातील, नक्षलवाद, कलम 370 काढून टाकलेल्या अमितभाईंना देशभक्ती दुसऱ्यांनी त्यांना शिकवण्याची आवश्यकता नाही, असे सडेतोड विधान त्यांनी केले आहे. एकनाथ शिंदे म्हणाले, विरोधी पक्षनेते म्हणून जो त्यांचा अधिकार आहे टु सभागृहात चर्चा करण्याचा त्याचबरोबर आंदोलन करण्याचा पण अधिकार आहे. परंतु, जंतर-मंतरला आंदोलन न करता पंतप्रधान मोदीजींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करणे हे पण एक मोठे षड्यंत्र होते आणि म्हणून फक्त राजकीय स्टंट न करता सकारात्मक चर्चा केली पाहिजे, असा खोचक सल्ला शिंदे यांनी राहुल गांधी यांना अप्रत्यक्ष दिला आहे. तसेच अमित भाईंचा राजीनामा मागणे म्हणजे एक प्रकारचे निव्वळ राजकारण आहे, हाथी चले बाजार बाकी पुढचे मी काय बोलत नाही, असेही शिंदे यांनी म्हटले. आम्ही बार्गेनिंग करणारे लोक नाही पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, आमची शिवसेना बाळासाहेबांची विचारधारा आनंद दिघे साहेबांची विचारधारा घेऊन पुढे जाणारी आहे. त्यामुळे आमची युती ही वैचारिक युती आहे आणि आम्ही बार्गेनिंग करणारे लोक नाही आहोत. हे आम्हाला द्या, ते आम्हाला द्या असे कधी आमची मागणी नसते. मोदीजी एनडीएचे प्रमुख आहेत, ते योग्य तो निर्णय घेण्यास सक्षम आहेत. त्यामुळे जो काही निर्णय घेतील तो देशहिताचा आणि एनडीएच्या हिताचा घेतील, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला आहे. अरविंद सावंत यांच्यावर एकनाथ शिंदेंची टीका अरविंद सावंत म्हणतात की सुप्रीम कोर्टात दोन दिवस सुनावणी झाली आणि त्यामुळे काका मला वाचा म्हणत दिल्ली दौरा केला. त्यांनी खरे म्हणजे त्यांचा न्यायालयावर विश्वास आहे की नाही, तो एकदा त्यांनी ठरवले पाहजे, असा सल्ला एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. तसेच आम्ही जे सरकार स्थापन केले होते ते पूर्ण संविधानाचा आदर आणि सगळे नियम पाळून, कायदे पाळून सरकार स्थापन केले आहे आणि हे चंद्रचूड साहेबांचे जजमेंट देखील स्पष्ट केले आहे. चंद्रचूड साहेबांनी निकाल दिल्यानंतर हेच लोक म्हणाले होते आम्ही आता जनतेच्या न्यायालयात जाऊ आणि आम्हाला जनता न्याय देईल काय परिस्थिती आहे? जनतेने पूर्णपणे आम्हाला आशीर्वाद दिला, जे आरोप करत होते, त्यांचे किती निवडून आले, विरोधी पक्षनेता होणे इतके पण नाही आले, अशी टीका शिंदे यांनी केली.
Source link
"हाथी चले बाजार, बाकी पुढचे बोलत नाही":एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला; म्हणाले- अमित शहांना देशभक्ती शिकवायची गरज नाही