![]()
सांगोला तालुक्यातील नाझरे गावचे सुपुत्र, ज्येष्ठ साहित्यिक व बालसाहित्यकार फारूक एस. काझी यांच्या साहित्याला मोठा सन्मान मिळाला आहे. गोवा राज्याच्या इयत्ता सहावीच्या ‘सुलभ गोमंत भारती’ या मराठी पाठ्यपुस्तकात त्यांच्या कथेचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे गोव्यातील हजारो विद्यार्थी आता त्यांच्या साहित्याचा अभ्यास करणार आहेत. गोवा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) प्रकाशित या पाठ्यपुस्तकात फारूक काझी यांच्या कथेची निवड झाल्याने सांगोला तालुक्यासह सोलापूर जिल्ह्याच्या साहित्यविश्वासाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे. ग्रामीण भागातील नाझरे येथून साहित्य क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या फारूक काझी यांनी बालसाहित्य, कथा, कविता आणि विविध साहित्यप्रकारांत सातत्याने लेखन केले आहे. त्यांच्या साध्या, ओघवत्या आणि मुलांच्या भावविश्वाला स्पर्श करणाऱ्या शैलीमुळे त्यांचे साहित्य वाचकांमध्ये लोकप्रिय ठरले आहे. गोव्याच्या शालेय पाठ्यपुस्तकात त्यांच्या कथेचा समावेश झाल्याने त्यांच्या साहित्यकार्याला राज्याबाहेरही मान्यता मिळाली असून, साहित्यप्रेमी आणि शिक्षण ग्रामीण मातीतून घडलेल्या एका साहित्यिकाची कथा गोवा राज्यातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार असल्याने हा सांगोला तालुक्यासह नाझरे गावासाठी अभिमानाचा क्षण मानला जात आहे. शिक्षण आणि साहित्य क्षेत्रातून फारूक काझी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या या यशामुळे ग्रामीण भागातील नवोदित लेखकांनाही प्रेरणा मिळणार आहे. क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. गोव्याच्या शालेय अभ्यासक्रमात स्थान मिळाल्याने साहित्यिकांनाही प्रेरणा मिळणार आहे. सांगोला तालुक्यासाठी अभिमानाचा क्षण प्रसिद्ध कथा पाठ्यक्रम समितीने निवडली माहीर, आई बाबा आणि विक्रम या नावाने प्रसिद्ध झालेली कथा पाठ्यक्रम समितीने निवडली. समितीने ही कथा विद्यार्थ्यांसमोर आणल्याने माझ्यासाठी ही विशेष बाब आहे. – फारुक काझी, गुरुजी. नाझरे
Source link
नाझरेच्या काझींची मराठी पाठ्यपुस्तकात कथा:शैक्षणिक गोवा राज्यातील हजारो विद्यार्थी साहित्याचा करणार अभ्यास