Headlines

नाट्य स्पर्धेमध्ये अकोला परिमंडळाच्या ‘चिंधी बाजार’ला मिळाले उपविजेतेपद:सुप्रिया घुटके उत्कृष्ट अभिनेत्री तर संजय पुरकरांना दिग्दर्शनाचा पुरस्कार‎



रंगमंचावरील कलागुणांचा अद्भुत आविष्कार, कलाकारांचा सळसळता उत्साह, प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने भारावून टाकणाऱ्या वातावरणात महावितरणच्या नागपूर प्रादेशिक आंतरपरिमंडलीय नाट्य स्पर्धेत अकोला परिमंडळाच्या ‘चिंधी बाजार’ या नाटकाने उपविजेतेपद पटका

.

या दोन दिवसीय नाट्योत्सवात नागपूर परिमंडळाच्या ‘थलाई कुथल’ या नाटकाने उत्कृष्ट अभिनय, प्रभावी सादरीकरणाने रसिकांची मने जिंकत सर्वोत्कृष्ट नाटकाचा बहुमान पटकावला. पारितोषिक वितरण महावितरणचे संचालक (संचलन) धनंजय ओंढेकर, कार्यकारी संचालक (नियोजन व ई-वाहन चार्जिंग स्टेशन्स) प्रसाद रेशमे यांच्या हस्ते झाले. सोहळ्याला नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक राजेश नाईक, मुख्य अभियंता दिलीप दोडके, दत्तात्रय बनसोडे, हरिश गजबे यांच्यासह स्पर्धेचे परीक्षक महेश पातुरकर, विवेक खेर, मिनाक्षी बोरकर यांची उपस्थिती होती. धनंजय ओंढेकर म्हणाले की, स्पर्धेत जय-पराजय होतच असतो. ज्यांना यश मिळाले नाही त्यांनी निराश न होता पुढील वर्षी नव्या ऊर्जेने उतरावे. या मंचावरून घडणारे कलाकार उद्या संपूर्ण महाराष्ट्रात महावितरणचे नाव उज्ज्वल करतील. कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे म्हणाले की, कलेचे सादरीकरण करताना कलाकाराने अनुभवलेला आनंद, रसिकांच्या चेहऱ्यावर फुलवलेले हास्य हेच कोणत्याही कलाकाराचे खरे पारितोषिक असते.

आयोजक, प्रभारी प्रादेशिक संचालक राजेश नाईक यांनी सांगितले की, महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी केवळ विजेचीच नाही तर आपल्या अभिनयाचीही रोषणाई मंचावर पसरवली आहे. नाटकाने समाजाला सुंदर, सकारात्मक संदेश दिला आहे. ज्येष्ठ रंगकर्मी, परीक्षक विवेक खेर यांनी कर्मचाऱ्यांमधील कलागुणांना वाव देत कुटुंबासारखे जपणाऱ्या महावितरण परिवाराचे कौतुक केले.पार्श्वसंगीतासाठी ‘थलाई कुटल’च्या अमित पेढेकर यांनी प्रथम, ‘एक होती राणी’च्या असित ढाकणेकर, डॉ. अविनाश आचार्य यांनी द्वितीय पारितोषिक मिळवले.रंगभूषा-वेशभूषा विभागात ‘थलाई कुटल’च्या अनुश्री पांडे व स्वाती फाटे यांनी प्रथम, ‘एक होती राणी’च्या प्रविण बिसेन व अरविंद कातकर यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. याशिवाय उषा धोटे (चिंधी बाजार), वैभव इंगळे (गुलाम), असित रामटेके (थलाई कुटल) आणि भाविन नांढा (एक होती राणी) यांना उत्तेजनार्थ पारितोषिकाने, तर बाल कलाकार अमय मोरे (चिंधी बाजार) आणि जीतू सिंह (एक होती राणी) यांना उत्तेजनार्थ पारितोषिकाने गौरवण्यात आले.

नाटकांची अनुभूती नाट्योत्सवात प्रेक्षकांना एकाहून एक सरस, आशयघन आणि दर्जेदार नाटकांची अनुभूती घेता आली. यामध्ये अकोला परिमंडळातर्फे ‘चिंधी बाजार’, अमरावती परिमंडळातर्फे ‘गुलाम’, नागपूर परिमंडळातर्फे ‘थलाई कुथल’ आणि चंद्रपूर परिमंडळातर्फे ‘एक होती राणी’ या नाटकांचे प्रयोग रंगले. या सोहळ्यासाठी नागपूर, अकोला, अमरावती, चंद्रपूर आणि गोंदिया या सर्व परिमंडलातून आलेले वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *