![]()
काँग्रेस नेते अध्यक्ष नाना पटोले यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन व्यक्ती पटोले यांचे पाय धुताना दिसत आहेत. या कृतीवरून आता नवा वाद पेटला असून, भारतीय जनता पक्षाने काँग्रेस आणि पटोलेंवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपचे आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांनी यावरून नाना पटोले यांची थेट ‘भोंदू बाबा’शी तुलना करत बोचरी टीका केली आहे. ‘नाना पटोले बाबा झाले की भोंदू बाबा?’ या व्हायरल व्हिडीओबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आमदार आशिषराव देशमुख यांनी अत्यंत खोचक शब्दांत टीका केली. ते म्हणाले, “नाना पटोले आता बाबा झाले आहेत का? पण ते बाबा झालेत की भोंदू बाबा झालेत, हा मोठा प्रश्न आहे. आताच दोन महिन्यांपूर्वी आपण सर्वांनी नाशिकच्या अशोक खरात या भोंदूबाबाचे कारनामे ऐकले आणि पाहिले आहेत. त्यामुळे आता नानांची अवस्थाही तशीच झाली आहे का?” ‘पाद्यपूजन करणाऱ्यांनाच विचारावे लागेल’ नेत्याचे असे जाहीरपणे पाय धुण्याच्या प्रथेवर टीका करताना देशमुख पुढे म्हणाले की, “ज्या लोकांनी पटोलेंचे पाद्यपूजन केले पाय धुतले, त्यांनाच आता विचारावे लागेल की नाना आता बाबा झालेत की भोंदू बाबा? खरंच त्यांच्यामध्ये अचानक कोणती दिव्य शक्ती संचारली आहे का? हा नक्कीच विश्लेषणाचा आणि त्या पाद्यपूजन करणाऱ्या लोकांना विचारण्याचा विषय आहे. राजकीय वर्तुळात रंगली चर्चा या व्हिडिओनंतर राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली असून, यावर काँग्रेसकडून काय भूमिका मांडली जाते, याकडे लक्ष लागले आहे. नाना पटोलेंचा व्हायरल व्हिडिओ.. हेही वाचा.. प्राप्तिकर भरणारे 94 हजार शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र: पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या जमा होणार 7 हजार कोटी राज्य सरकारच्या बहुचर्चित ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026’ बाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. या योजनेसाठी सहकार विभागाने केलेल्या डेटा पडताळणीत तब्बल 94,083 शेतकरी ‘आयकरदाते’ असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे हे शेतकरी या कर्जमाफी योजनेसाठी अपात्र ठरले असून यामुळे राज्य सरकारचे तब्बल 1,881 कोटी 66 लाख रुपये वाचले आहेत. तर दुसरीकडे, छाननीनंतर पात्र ठरलेल्या 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, येत्या मंगळवारी (4 ऑगस्ट) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डीबीटी (DBT) द्वारे एकाच वेळी सुमारे 7 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात जमा केले जाणार आहेत. यासाठी शासनाने 30 जुलै 2026 रोजी 7 हजार कोटी रुपयांच्या निधी वितरणास प्रशासकीय मान्यता दिली आहे. सविस्तर वाचा
Source link
नाना पटोलेंमध्ये खरंच कोणती दिव्य शक्ती आलीये का?:पाद्यपूजनाच्या व्हायरल व्हिडीओवरून आशिष देशमुखांची टीका