![]()
सायलेन्सरमधून फटाक्यासारखा आवाज काढणाऱ्या बुलेट चालकांविरुद्ध हडपसर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी बुलेटसह एकूण 11 दुचाकी जप्त केल्या असून, 18 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. काळेपडळ, कडनगर चौक, महंमदवाडी, उंड्री आणि रहेजा व्हिस्टा चौक परिसरात रात्री-अपरात्री भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकी व बुलेट चालकांकडून फटाक्यांसारखे आवाज काढले जात होते. यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते, त्यांनी पोलिसांकडे याबाबत तक्रारी केल्या होत्या. नागरिकांच्या तक्रारीनंतर, सायलेन्सरमधून आवाज काढणाऱ्या दुचाकीस्वार आणि बुलेट चालकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी पोलिसांनी एक विशेष पथक नेमले होते. सहायक पोलिसफौजदार राजस शेख, हवालदार प्रवीण काळभोर, महादेव शिंदे आणि गिरीराज जगदाळे यांनी ही कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी बुलेटसह 11 दुचाकी जप्त केल्या. मोटार वाहन कायदा, सार्वजनिक शांततेचा भंग करणे आणि केंद्रीय मोटार वाहन कायदा कलम 120 अन्वये 18 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिमंडळ सहाचे पोलिसउपायुक्त जीवन बेनीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिसनिरीक्षक गिरीषा निंबाळकर, गुन्हे शाखेचे पोलिसनिरीक्षक अण्णासाहेब बाबर, सहायक निरीक्षक विलास सुतार, राजस शेख, प्रवीण काळभोर, अमोल फडतरे, नीलेश देसाई, दाऊद सय्यद, प्रतीक लाहीगुडे, शाहिद शेख, अतुल पंधरकर, नितीन ढोले आणि विशाल ठोंबरे यांनी ही कारवाई यशस्वी केली. तरुणाची सोनसाखळी चोरी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या तरुणाच्या गळ्यातील एक लाख रुपयांची सोनसाखळी चोरट्यांनी लांबविल्याची घटना सारसबाग परिसरात घडली. याबाबत एका तरुणाने स्वारगेट पोलिसठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त सारसबाग परिसरातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी स्वारगेट परिसरातील लक्ष्मीनारायण चित्रपटगृहाजवळ गर्दीत तरुणाच्या गळ्यातील एक लाख रुपयांची सेानसाखळी चोरली. सहायक पोलिसनिरीक्षक एन शेळके तपास करत आहेत.
Source link
पुण्यात फटाका सायलेन्सरवाल्या बुलेट चालकांवर धडक कारवाई:11 दुचाकी जप्त, 18 जणांवर गुन्हा दाखल