![]()
नाना पाटेकर यांच्या निधनाच्या वृत्ताने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. वयाच्या ७५ व्या वर्षी गोव्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा मुलगा मल्हार पाटेकर याने या दुःखद घटनेची माहिती दिली. गंभीर, खलनायकी आणि विनोदी अशा सर्वच भूमिकांना आपल्या खास शैलीने जिवंत करणाऱ्या या अष्टपैलू कलाकाराच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. दरम्यान, त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर त्यांचा अवघ्या चार दिवसांपूर्वीचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून, तो पाहून चाहते अत्यंत भावूक झाले आहेत. अखेरच्या व्हिडीओत उलगडला अभिनयाचा प्रवास चर्चेत असलेला हा व्हिडिओ गोव्यातीलच एका कार्यक्रमातील असल्याचे समजते. यामध्ये नाना पाटेकर अत्यंत मनमोकळेपणाने त्यांच्या सुरुवातीच्या संघर्षाबद्दल आणि नट होण्याच्या प्रवासाबद्दल बोलताना दिसत आहेत. आपल्या अभिनय कारकिर्दीचे संपूर्ण श्रेय त्यांनी रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेत्री सुलभाताई यांना दिले आहे. जुन्या आठवणींना उजाळा देताना नाना म्हणतात, “त्या गर्दीत बसलेल्या माझ्याकडे पाहून, हा अरविंद (मुलगा) करू शकेल असा विश्वास सुलभाताईंनी दाखवला.” जर त्यावेळी त्यांनी मला संधी दिली नसती, तर मी कधीच रंगमंचावर उभा राहू शकलो नसतो, अशी कृतज्ञतेची भावना त्यांनी या व्हिडिओत व्यक्त केली आहे. पहिला पुरस्कार आणि नट झाल्याचा साक्षात्कार याच संवादात त्यांनी आपल्या पहिल्या नाटकाची आणि त्याला मिळालेल्या यशाची आठवण सांगितली. राज्य नाट्य स्पर्धेत नानांच्या नाटकाला मोठे यश मिळाले होते. स्वतः नानांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा, तर सुलभाताईंची बहीण मच्छूताई यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. हा पुरस्कारच आपल्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरल्याचे नानांनी म्हटले आहे. “तिथेच कुठेतरी मला उपरती झाली, एक दृष्टांत झाला की आता मी नट आहे,” असे नाना या व्हिडिओमध्ये सांगताना दिसतात. याच साक्षात्काराने त्यांच्यातील खऱ्या कलाकाराला जन्म दिला. अभिनयासाठी सोडली १२०० रुपयांची नोकरी नाना पाटेकरांचा अभिनयावरील विश्वास इतका दृढ झाला होता की, त्यांनी त्यासाठी मोठा त्याग केला. १९७१-७२ च्या काळात एका बाजूला नोकरी आणि दुसऱ्या बाजूला नाटकाची ओढ असा पेच त्यांच्यासमोर होता. त्यावेळी त्यांना महिन्याला तब्बल १२०० रुपये पगार होता. त्या काळात ही रक्कम अतिशय मोठी मानली जात होती. मात्र, केवळ अभिनयाच्या वेडापायी त्यांनी ही नोकरी सोडण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि स्वतःला पूर्णपणे रंगभूमीला वाहून घेतले. नाना पाटेकरांच्या अचानक जाण्याने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली असून, त्यांच्या याच शेवटच्या व्हिडिओच्या माध्यमातून चाहते आणि कलाकार त्यांना सोशल मीडियावर भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहेत. हेही वाचा.. अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन:वयाच्या 75व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन, 45 मिनिटे CPR देऊनही वाचवता आले नाही ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे आज सकाळी निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या गोव्यातील घरी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्यावर सुमारे 45 मिनिटे सीपीआर (CPR) देण्यात आले, परंतु त्यांचा जीव वाचवता आला नाही. डॉ. शेखर साळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर यांचे पहाटे 5वाजून 20 मिनिटांनी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर वैद्यकीय-कायदेशीर खटला (MLC) दाखल करण्यात आला असून, शवविच्छेदन केले जाईल. सविस्तर वाचा
Source link
नाना पाटेकरांचा अखेरचा व्हिडिओ चर्चेत:‘त्या गर्दीत बसलेला मी…’ म्हणत सांगितला रंगभूमीवर येण्याचा प्रवास