![]()
भारतीय चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू, दिग्गज आणि आपल्या सखोल अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे आज सकाळी निधन झाले आहे. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी गोव्यातील आपल्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. गोव्यातील घरी असताना त्यांना अचानक तीव्र हृदयविकाराचा झटका आला. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली पण त्यांचा जीव वाचवता आला नाही. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वात आणि राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी- गडकरी नितीन गडकरी म्हणाले की, भारतीय चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक आणि दुःखद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. नानांचे आणि माझे अतिशय जवळचे आणि मैत्रीपूर्ण संबंध होते. आपल्या दमदार अभिनयाने पाच दशकांहून अधिक काळ नाना पाटेकर यांनी मराठी व हिंदी चित्रपटांच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण संवाद शैलीने त्यांनी चित्रपटातील अनेक पात्रे अजरामर केली व आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांचे जाणे ही भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी आहे. ‘नाम फाऊंडेशन’च्या माध्यमातून पाणी संरक्षण, संचयन क्षेत्रांत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आणि महत्त्वपूर्ण आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी त्यांनी दिलेला मदतीचा हात अनेक कुटुंबांचा आधार बनला. नाना एक उत्तम कलाकार-अभिनेते असण्याबरोबरच समाजाप्रती संवेदनशील असलेले एक व्यक्तिमत्त्व होते. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती प्रदान करो. ॐ शांती. अष्टपैलू कलाकार गमावला – रोहित पवार रोहित पवार म्हणाले की, सामाजिक जाण आणि भान असलेले ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचं वृत्त अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारं आहे. त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीने एक संवेदनशील, प्रभावी आणि अष्टपैलू कलाकार गमावला आहे.‘परिंदा’, ‘क्रांतिवीर’, ‘प्रहार’, ‘खामोशी’, ‘अग्निसाक्षी’, ‘नटसम्राट’, ‘वेलकम’ यांसारख्या असंख्य चित्रपटांमधून त्यांनी आपल्या दमदार अभिनयाची अमीट छाप उमटवली. पडद्यावरील अभिनयासोबतच ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून शेतकरी, दुष्काळग्रस्त आणि ग्रामीण भागातील जनतेसाठी केलेले त्यांचं सामाजिक कार्य त्यांच्या संवेदनशील मनाची साक्ष देणारं आहे.कलेच्या माध्यमातून लाखो मनांवर अधिराज्य गाजवणाऱ्या आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या महान कलाकाराला माझी भावपूर्ण श्रद्धांजली!💐🙏ॐ शांती! करारी अभिनेता आपण गमावला- शेलार आशिष शेलार म्हणाले की, करारी अभिनेता आपण गमावला !मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील आपल्या अभिनयाने अजरामर ठसा उमटविणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे.आपल्या दमदार अभिनयाने अनेक भूमिका जिवंत करणाऱ्या नानांनी रंगभूमी, चित्रपट आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यांच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीने एक संवेदनशील, करारी, प्रतिभावान आणि अस्सल कलावंत गमावला आहे. महाराष्ट्र शासनानाच्या वतीने देण्यात येणाऱ्या स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार 2013 पुरस्कारासह चित्रपट क्षेत्रातील अनेक पुरस्कारांचे ते मानकरी ठरले होते. मध्यमवर्गीय कामगार मराठी कुटुंबातून पुढे आलेल्या नाना पाटेकर यांनी अपार मेहनत व आपल्या वेगळ्या शैलीने अभिनयात ठसा उमटवला. आमच्या गिरणगावातील एक अस्सल, इरसाल, उत्सव प्रेमी मराठी माणूस आम्ही आज गमावला आहे.नाना पाटेकर यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली!ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो. त्यांच्या असंख्य चाहत्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.ॐ शांती! 🙏
Source link
अभिनयाचा 'नटसम्राट' हरपला!:ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गोव्यात निधन; राजकीय, सामाजिक क्षेत्रातून शोककळा