Headlines

दुष्काळ मोर्चाच्या यशस्वितेसाठी फुलंब्री येथे आढावा बैठक:खा. काळेंचे नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन‎




मराठवाड्यातील भीषण दुष्काळ आणि सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे ‘भव्य जनआक्रोश दुष्काळ मोर्चा’चे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या अध्यक्षतेखाली फुलंब्री येथील जनसंपर्क कार्यालयात आढावा बैठक पार पडली. हा मोर्चा मंगळवार, १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता पैठण गेट ते विभागीय आयुक्त कार्यालयावर निघणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात निघणाऱ्या या मोर्चास विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, अमित देशमुख, डॉ. कल्याण काळे यांच्यासह प्रमुख नेत्यांची उपस्थिती लाभणार आहे. यावेळी खासदार कल्याण काळे यांनी, तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, युवक आणि नागरिकांनी आपल्या हक्काच्या लढ्यासाठी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले. बैठकीस जगन्नाथ काळे, तालुकाध्यक्ष संतोष मेटे, संदीप बोरसे, रेखा वहाटुळे, राहुल सावंत, श्रीमंत उकीर्डे, निसार खान, गायकवाड, विटेकर उपस्थित होते. या आहेत प्रमुख मागण्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पंचनाम्यांशिवाय सरसकट हेक्टरी १ लाख रुपयांची मदत. पीक विमा भरपाई आणि सर्व शेती कर्जे सरसकट माफ. फळबागांसाठी हेक्टरी २ लाख रुपयांची मदत. शेतीसाठी अखंडित वीज, टँकरद्वारे पिण्याचे पाणी व जनावरांसाठी चारा छावण्या. विद्यार्थ्यांची संपूर्ण शैक्षणिक फी माफी व नियमित कर्जदारांना १ लाख रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *