Headlines

नेते-कार्यकर्त्यांनी जनतेत दिसावे, होर्डिंग्जवर नाही: पुण्यातील फ्लेक्स काढा मोहिमेचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक; नागपूर अधिवेशनासाठीही दिले कडक निर्देश


पुण्यातील अतिक्रमण आणि अनधिकृत फ्लेक्सबाजीविरोधात पुणे महानगरपालिकेने सुरू केलेल्या अभिनव ‘भाऊ फ्लेक्स काढा’ या मोहिमेची दखल थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून त्यांनी महापालिका प्रशासनाचे मनापासून अभिनंदन केले आहे. विशेष म्हणजे, या मोह

.

शुक्रवारी (27 नोव्हेंबर) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर पोस्ट करत फडणवीस म्हणाले की, “पुणे प्रशासनाला मी सांगेन की, उद्या माझ्या नावाचे जरी बेकायदा होर्डिंग लागले, तरी तुमच्या त्या पुरस्कारांच्या यादीत माझेही नाव जाहीर करा! नेते असोत की कार्यकर्ते, ते कायम जनतेतच दिसले पाहिजेत, बेकायदा होर्डिंग्जवर नाही.” यासोबतच आगामी नागपूर विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर प्रशासनालाही शहर विद्रुप होणार नाही याची आत्तापासूनच खबरदारी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

नियम केवळ शासकीय दस्तावेजात छापण्यासाठी नसतात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून अस्सल ‘पुणेरी’ धाटणीच्या या मोहिमेचे कौतुक करत सर्वच राजकीय नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आरसा दाखवला आहे. पुण्यात सध्या अतिक्रमणाविरोधात आणि विशेषतः अवैध होर्डिंगविरोधात जी कारवाई सुरू आहे, त्याबद्दल मी पुणे महापालिका प्रशासनाचे मनापासून कौतुक व अभिनंदन करतो. शहरातील पायाभूत सुविधांचा नागरिकांना योग्य वापर करता आला पाहिजे; वाहनांसाठी आणि पायी चालण्यासाठी मोकळ्या जागा असल्या पाहिजेत. शेवटी नियम हे केवळ जीआर (GR) किंवा शासकीय दस्तावेजात प्रकाशित करण्यासाठी नसतात, तर ते प्रत्यक्ष पाळायचे असतात आणि सर्वसामान्यांचे जीवन सुखकारक करणे हाच त्यांचा खरा हेतू असतो.

माझ्या नावाचे होर्डिंग लागले तरी कारवाई करा

बेकायदेशीर होर्डिंग ही केवळ पुण्याची नव्हे, तर सर्वत्र असलेली मोठी समस्या आहे. त्यावर सातत्याने आणि नियमितपणे कारवाई झालीच पाहिजे. पुण्याने स्वीकारलेल्या या अभिनव आणि अस्सल ‘पुणेरी’ संकल्पनेचे कौतुक करावे तितके कमी आहे. उद्या माझ्या स्वतःच्या नावाचे जरी बेकायदा होर्डिंग लागले, तरी प्रशासनाने कोणताही मुलाहिजा न ठेवता पुरस्कारांच्या यादीत माझेही नाव जाहीर करावे.

नागपूर अधिवेशनापूर्वी प्रशासनाला सतर्कतेचा इशारा

आगामी काळात नागपूर येथे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होणार आहे. तिथेही नेते आणि कार्यकर्त्यांकडून बेकायदेशीर होर्डिंग्जचा धडाका सुरू होईल. त्यामुळे नागपूर प्रशासनाने आत्तापासूनच जनजागृती करावी आणि शहराचे विद्रुपीकरण होणार नाही याची कडक खबरदारी घ्यावी. नेते असोत की कार्यकर्ते, ते कायम जनतेतच दिसले पाहिजेत, बेकायदा होर्डिंग्जवर नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितले.

काय आहे पुणे महापालिकेची ‘भाऊ फ्लेक्स काढा’ मोहीम?

शहराचे विद्रुपीकरण रोखण्यासाठी पुणे महापालिकेने 24 नोव्हेंबर 2026 पासून ‘भाऊ फ्लेक्स काढा’ ही अनोखी डिजिटल मोहीम सुरू केली असून, यामध्ये पुणेकरांना थेट सहभागी करून घेतले आहे. या मोहिमेअंतर्गत महापालिकेने bhauflexkadha.pmc.gov.in हे विशेष संकेतस्थळ सुरू केले आहे. नागरिकांना शहरातील चौक, रस्ते, पदपथ आणि झाडांवर लावलेल्या अनधिकृत फ्लेक्सचे छायाचित्र काढून या पोर्टलवर अपलोड करता येते. ज्यांचे सर्वाधिक अनधिकृत फ्लेक्स आढळतील, त्यांचे नाव आणि छायाचित्र अवघ्या 24 तासांत या संकेतस्थळावर ‘विद्रुपीकरण पुरस्काराचे मानकरी’ म्हणून जाहीर केले जात आहे.

महापौरांसह सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांचीच कोंडी

शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या गप्पा मारणाऱ्या राजकीय नेत्यांना पुणेकरांनी पहिल्याच दिवसापासून जोरदार प्रतिसाद देत आरसा दाखवला आहे. या तक्रारींमध्ये सर्वाधिक फ्लेक्स हे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या (BJP) पदाधिकाऱ्यांचे असल्याचे समोर आले आहे. पुणे महापालिकेच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून खुद्द महापौर मंजुषा नागपुरे यांनाही घरचा आहेर मिळाला असून त्या प्रशासनाच्या रडारवर आल्या आहेत.

पहिल्या ‘विद्रुपीकरण पुरस्काराचे’ मानकरी

महापालिकेने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत भाजपचे स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, नगरसेवक पृथ्वीराज सुतार आणि सुनील पांडे यांची नावे ‘विद्रुपीकरण पुरस्काराचे’ मानकरी म्हणून समाविष्ट झाली आहेत. तर व्यावसायिक आणि ब्रँड्स गटामध्ये ब्रम्हप्रिया वर्ल्ड स्कूल, आर जीज बिर्याणी आणि शांती शिखर (शांतिप्रिया) यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. वाढदिवस, सत्कार आणि नियुक्त्यांच्या निमित्ताने फ्लेक्सबाजी करणाऱ्या पुढाऱ्यांना या मोहिमेमुळे मोठा दणका बसला आहे.

————————————————————

हेही वाचा…

दोन हाणा पण बाजीराव म्हणा अशी रोहित पवारांची अवस्था: ते तर महाराष्ट्राचे ज्युनिअर संजय राऊत; भाजप प्रवक्ते अजित चव्हाण यांची सडकून टीका

उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर टीका केल्यानंतर दिलगिरी व्यक्त करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आमदार रोहित पवार यांच्यावर भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण यांनी शुक्रवारी अत्यंत बोचऱ्या शब्दांत हल्लाबोल केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.