भारतीय जनता पार्टीच्या वतीने 1 ते 25 डिसेंबर 2026 या कालावधीत देशभरात ‘सेवा दूत अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या पूर्वतयारीसाठी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित मराठवाडा विभागीय कार्यशाळेला भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी
.
या कार्यशाळेत अभियानाचे सूक्ष्म नियोजन, कार्यपद्धती आणि प्रभावी अंमलबजावणी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना रविंद्र चव्हाण यांनी असे आवाहन केले की, “समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचून त्यांच्या अडीअडचणी व समस्या जाणून घेणे, त्यांना आवश्यक ते सहकार्य करणे आणि सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविणे, हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी परस्पर समन्वयाने काम करावे.”



या विभागीय कार्यशाळेस भाजपाचे राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाशजी, खासदार डॉ. भागवत कराड, प्रदेश सरचिटणीस सुनील राणे, आमदार विक्रांत पाटील, माजी आमदार संजय केनेकर यांच्यासह मराठवाडा विभागातील सर्व जिल्हाध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.