Headlines

नेपाळमध्ये महापुराचा हाहाकार!:महाराष्ट्राचे 60 पर्यटक बेपत्ता, 404 पैकी 338 नागरिक सुरक्षित; महत्त्वाची माहिती समोर




नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापुरामुळे मोठा विध्वंस झाला असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या महाप्रलयात शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला असून हजारो लोक बेपत्ता असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या नैसर्गिक आपत्तीचा फटका केवळ नेपाळलाच नाही, तर इतर अनेक देशांनाही बसला आहे. या पुराच्या तडाख्यात महाराष्ट्रातील अनेक पर्यटकही नेपाळ आणि तिबेटच्या सीमाभागात अडकले आहेत. मिळालेल्या शासकीय अहवालानुसार, 26 ऑगस्ट रोजी अचानक आलेल्या या पुरामुळे नेपाळ-तिबेटमध्ये महाराष्ट्रातील एकूण 404 पर्यटक अडकले होते. त्यापैकी प्रशासनाने 338 नागरिकांशी संपर्क साधून ते सुरक्षित असल्याची खात्री केली आहे. या सुरक्षित पर्यटकांपैकी 37 जणांचा एक गट सागा (तिबेट) येथून निघाला असून त्यांना सुखरूपपणे भारतात परत आणले जात आहे. 60 पर्यटक अद्याप बेपत्ता नेपाळमध्ये अडकलेल्या 404 पर्यटकांपैकी 60 नागरिक अद्याप बेपत्ता आहेत. हे सर्वजण मुंबईतील एका ट्रॅव्हल कंपनीच्या माध्यमातून नेपाळला गेले होते. प्रशासनाला अद्याप या गटाशी थेट संपर्क साधण्यात यश आलेले नाही. याशिवाय, अन्य सहा नागरिकांची माहिती एका ऑनलाइन लिंकद्वारे प्रशासनाला प्राप्त झाली असली तरी, अधिकाऱ्यांचा त्यांच्याशीही अद्याप कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत माहिती संकलन परराष्ट्र मंत्रालयाने सध्या चीन आणि तिबेटच्या प्रदेशात सुरक्षित असलेल्या 149 भारतीयांची यादी महाराष्ट्र सरकारकडे सुपूर्द केली आहे. हे नागरिक राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांचे रहिवासी आहेत. त्यांची ओळख पटवणे आणि पुढील कार्यवाहीच्या समन्वयासाठी राज्य सरकारने ही यादी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवली असून, त्यांच्यामार्फत या सर्व नागरिकांची माहिती गोळा करण्याचे काम वेगाने सुरू आहे. बचाव आणि शोधकार्य सुरू राज्याचे आपत्कालीन कार्य संचालन केंद्र परराष्ट्र मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षाशी सातत्याने समन्वय साधून आहे. बेपत्ता आणि सुरक्षित नागरिकांच्या अद्ययावत याद्या नियमितपणे अद्ययावत करून पाठवल्या जात आहेत. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार बाधित भागांमध्ये बचाव पथके तैनात करण्यात आली असून, बेपत्ता असलेल्या नागरिकांचा कसून शोध घेण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *