Headlines

न्यायालयात टिकेल असे हक्काचे आरक्षण मराठा समाजाला मिळेल:कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही – शिवेंद्रराजे भोसले




मराठा समाजाला न्यायालयात टिकेल असे हक्काचे आरक्षण नक्की मिळेल, असा ठाम विश्वास भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात सध्या मोठे सामाजिक वातावरण तापलेले असताना, शिवेंद्रराजे यांनी राज्य सरकारच्या भूमिकेचे समर्थन करत मराठा समाजाला आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे. इतर समाजांवर अन्याय नाही मराठा आरक्षणाच्या मागणीवर बोलताना शिवेंद्रराजे भोसले यांनी स्पष्ट केले की, “न्यायालयात टिकेल असे हक्काचे आरक्षण मराठा समाजाला मिळेल. हे आरक्षण देताना राज्यातील इतर कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही, याची पूर्ण काळजी राज्य सरकार घेणार आहे.” आरक्षणाचा गुंता सोडवताना सर्वसमावेशक तोडगा काढला जाईल, असे संकेत त्यांनी यातून दिले आहेत. तसेच, याआधीही सरकारने मराठा आरक्षणाचा मुद्दा अत्यंत सकारात्मकतेनेच हाताळला असल्याचे त्यांनी सांगितले. उद्यापासून जरांगे पाटलांचे उपोषण दरम्यान, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम उद्या संपत आहे. उद्यापासून मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीमध्ये आपले निर्णायक उपोषण सुरू करत आहेत. जरांगे पाटील यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत मराठा बांधवांना मोठ्या संख्येने अंतरवालीत येण्याचे आवाहन केले आहे. मनोज जरांगेंच्या मागण्या मुख्यमंत्री 100% पूर्ण करतील – प्रसाद लाड मनोज जरांगे हे मुख्यमंत्र्यांवर काही बोलतील असे मला वाटत नाही. कारण गेल्या 3 महिन्यांत मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून जितके जीआर काढायचे होते, तेवढे काढण्यात आले आहेत. काही विभागांत हे जीआर पोहोचलेले नाहीत किंवा ग्रामीण पातळीवर तफावत राहिली आहे, हे आम्ही मान्य करतो. परंतु, समाजात तेढ निर्माण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्र्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले आहेत, अशी माहिती भाजप आमदार प्रसाद लाड यांनी दिली. आमदार प्रसाद लाड म्हणाले, सध्या सणासुदीचे दिवस असून मुंबईत गणेशोत्सव आणि दहीहंडी मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. त्यामुळे मनोज जरांगे यांनी मुंबईत येऊ नये, असे आमचे आवाहन होते. आमच्या विनंतीचा मान ठेवत त्यांनी मुंबईत न येण्याचा निर्णय जाहीर केला आहे. जरांगे पाटील यांच्या ज्या काही मागण्या आहेत, त्या मुख्यमंत्री 100 टक्के पूर्ण करतील. तर सदावर्ते माझे मित्र आहेत, ते असे का करत आहेत याची कल्पना नाही, पण मी त्यांच्याशी नक्की बोलेन. हेही वाचा.. हे सरकार मराठ्यांच्या लेकरांचे वाटोळे करतंय: जरांगे पाटलांचा संताप, थेट मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर धडक देण्याचा इशारा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम आज संपत असून, उद्यापासून अंतरवाली सराटी येथे निर्णायक आंदोलनाला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत सरकारच्या भूमिकेवर जोरदार टीका केली. कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेले, मात्र अधिकाऱ्यांनी अर्ज स्वीकारले नाहीत किंवा नोंदी सापडूनही प्रमाणपत्र दिले नाही, अशा सर्व मराठा बांधवांनी अंतरवाली सराटीत दाखल व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *