![]()
न्यू इंग्लिश हायस्कूलच्या एकूण ४३ विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबात शालेय क्रीडांगणावर नियमित सराव करून क्रीडा क्षेत्रात विभागीय व राज्यस्तरावर चमकदार कामगिरी करत क्रीडा गुण सवलतीचे अतिरिक्त गुण मिळवले. प्रीती काकडे ही शासकीय एलिमेंटरी व इंटरमिजीएट ग्रेड परीक्षेत विदर्भातूत प्रथम मेरिट व महाराष्ट्रातून १६ वी मेरी आली होती. यशस्वी विद्यर्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष अॅड . राजेश्वर देशपांडे तसेच पदाधिकारी,मुख्याध्या पक .माधव मुनशी सर,उपमुख्याध्यापक उदय हातवळणे, पर्यवेक्षक . हेमंत ओझरकर, अलका मुंढे, एसएससी परीक्षा प्रमुख मिलिंद घोगले शिक्षक तथा शिक्षेकेतर कर्मचारी यांनी केले. शाळेतील विद्यार्थी केवळ अभ्यासातच नव्हे तर क्रीडा क्षेत्रात देखील समाधान कामगिरी करत असल्याने शाळेने सर्वांचे अभिनंदन केले. प्रतिनिधी | अकोला माध्यमिक शालांत परीक्षेचा न्यू इंग्लिश हायस्कूलचा निकाल ९० टक्के लागला. परीक्षेला एकूण १७० विद्यार्थी बसले होते. त्यातून १५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ९० टक्के निकाल लागला आहे. प्रफुल्ल फुलसिंग चव्हाण हा ९३.४० टक्के गुण घेऊन शाळेतून प्रथम आला. विराज सुभाष जणबंधु याने ९१ टक्के घेऊन िद्वतीय क्रमांक पटकवला. प्रिती ज्ञानदेव काकडे हिने ८९ टक्के गुण घेऊन चवथा क्रमांक पयकावला. . मोहित संदीप घोडेस्वारला ८८.८० टक्के गुण मिळाले. नियमित अभ्यास, भरपूर सराव तसेच शाळेतील ग्रंथालयचा वापर हि त्रिसूत्री यशाचे गमक ठरल्याचे शाळेचे मुख्याध्यापक माधव मुनशी यांनी सांगितले. यंदा दहावीच्या निकालात विद्यार्थ्यांनी यश मिळवल्यानंतर शाळा प्रशासनाकडून समाधान व्यक्त करण्यात आले आहे. पालकांनी देखील शाळेचे अभिनंदन केले आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनी क्री डा क्षेत्रातही मारली बाजी
Source link
न्यू इंग्लिश हायस्कूलचा 90 टक्के निकाल; प्रफुल्ल चव्हाण सर्वप्रथम, शाळेतील विद्यार्थ्यांनी क्री डा क्षेत्रातही मारली बाजी