Headlines

पंतप्रधान नरेंद्र मोदींना खोटे बोलण्याचा राष्ट्रीय आजार जडलाय:देशाला फक्त काँग्रेसच नेतृत्व देऊ शकते, हे मोदींनीच सिद्ध केले- खासदार संजय राऊत




नरेंद्र मोदी काय बोलतात याकडे देश गांभीर्याने पाहात नाहीत. ते नियमबाह्य आणि निवडणूक काळात आचारसंहितेचा भंग होईल असे वर्तन पंतप्रधान करत असतात. कायदा माझे काय वाकडे करणार या भूमिकेत ते असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खोटे बोलण्याचा राष्ट्रीय आजार जडलेला आहे, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, महिला विधेयकाची गो हत्या सत्ताधाऱ्यांनी केली आहे. ते विधेयक 2023 मध्येच मंजूर झाले आहे. त्यानंतर तुम्ही राष्ट्राला संबोधित सुद्धा केले होते ते भाषण ऐका. देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट बघा. 2023 ला मंजूर झालेले विधेयक अमलात आणले नाही म्हणून तुम्ही माफी मागितली पाहिजे. खोटे अश्रू पाहून देशातील जनता आता फसणार नाही. एक विधेयक मंजूर झाले नाही हे काही राष्ट्रावर संकट नाही तर भाजपवर संकट आहे. त्यांच्या पक्षावरील संकटासाठी राष्ट्राला संबोधन करणे योग्य नाही. तुमच्यासाठी देशाचे माध्यमे वापरणे अगदी चुकीचे आहे. 2023 मध्ये संसदेत काय झाले हे एकदा तपासले पाहिजे. म्हणून भाजपला 850 जागा हव्या संजय राऊत म्हणाले की, मोदी यांनी कालच्या भाषणामध्ये 86 वेळा काँग्रेसचा उल्लेख केला. जे काँग्रेसमुक्त भारत करायला निघाले होते त्यांच्या डोक्यातून काँग्रेस निघायला तयार नाही. त्यांच्या नसात, आणि रक्तात काँग्रेस आहे. काँग्रेसशिवाय देशाला कोणी नेतृत्व देऊ शकत नाही हे मोदी त्यांच्या कृतीमधून सिद्ध करत आहेत. भाजपला लोकसभेच्या 850 जागा करायच्या होत्या त्यापासून आम्ही त्यांना रोखले, त्यांचा आणि महिला आरक्षणाचा काहीही संबंध नाही. 543 पैकी 33 टक्के जागा महिलांना देण्यास आमची काही हरकत नाही. पण त्यामुळे भाजपच्या नेत्यांच्या जागा आरक्षित होऊ शकतात. त्या होऊ नये म्हणून त्यांना 850 जागा करायच्या आहेत. खोटे धंदे बंद करा संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा देश कायम पेटवायचा होता. कधी लव्ह जिहादच्या नावावर, कधी काय खावे हे मुद्दे निर्माण करतात. पण त्यांना कधी असे काही वाटत नाही काश्मीरमध्ये मारल्या गेलेल्या लोकांच्या घरातील महिलांचा आक्रोश त्यांना कधी दिसला नाही, तुम्ही हे खोटे धंदे बंद करा. आम्ही सर्वांनी मिळून या बिलाचा पराभव केला. 1992 मध्ये घरात बसले होते संजय राऊत म्हणाले की, दक्षिणेतील राज्यांवर त्या बिलामुळे अन्याय झाला असता. भाजप देश तोडायला निघाले आहे. तोडा-फोडा आणि राज्य करा हे त्यांचे काम सुरू आहे. पण आम्ही सर्व जण एकत्र येत त्यांचा पराभव केला. धर्मांतरण विरोधी कायदा आणला असला तरी प्रकरणाचा संपूर्ण तपास झाला पाहिजे. सरकारपेक्षा आमच्याकडे जास्त माहिती असते. खरात जर सलीम असता तर आतापर्यंत त्यांच्यावर कठोर कारवाई झाली असती. खरात भाजपचे प्रचारक असल्याने त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. पण टीसीएस प्रकरणी जसे काही खूप मोठे झाले असा कांगावा करत हिंदू खतऱ्यामध्ये आला असे सांगातात. 1992 मध्ये आम्ही रस्त्यावर होतो तेव्हा हे लोकं घरात बसले होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *