![]()
संसदीय अधिवेशनादरम्यान मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांवर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 10 केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली. या वेळी मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम आणि अन्यायकारक टोलच्या मुद्द्यावर त्यांनी नितीन गडकरींचे लक्ष वेधले असून, यावर गडकरींनी तातडीने कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. सुनील तटकरे म्हणाले, संबंध अधिवेशनात लोकसभा मतदारसंघातील अनेक विषय मांडता आले नाहीत. त्यामुळे उपलब्ध असलेल्या वेळेत काही जे महत्त्वाचे प्रश्न जे आहेत, त्या संबंधातील मंत्र्यांना भेटलो. जवळपास 10 मंत्र्यांना मी भेटलो. माननीय पंतप्रधान मोदींची भेट झाली ती सदिच्छा भेट आणि मार्गदर्शनासाठी होती. मुंबई-गोवा महामार्गावरील टोल संदर्भात गडकरींची भेट पुढे बोलताना सुनील तटकरे म्हणाले, प्रामुख्याने समस्त कोकणवासीयांना भेडसावणारा जो प्रश्न आहे, मुंबई-गोवा महामार्गच्या संदर्भातला आणि त्या रस्त्यावर सुरू असलेला टोल. त्याबद्दल रस्त्याचे रखडलेले काम असताना जे टोल सुरू आहेत, त्या संदर्भात नितीन गडकरी यांची भेट घेतली. यात त्यांनी तातडीने काही सूचना दिल्या आहेत. कोकणात ऑर्गनिक फार्मिंग संदर्भात शिवराजसिंह चव्हाण यांच्याशी चर्चा सुनील तटकरे म्हणाले, केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चव्हाण यांची देखील मी भेट घेतली. त्यात विशेषतः कोकणात ऑर्गनिक फार्मिंग आणि अॅग्रिकल्चर क्रॉप्स या संदर्भातले काही विषय होते. त्याच सोबत दत्तात्रय भरणे यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर आपल्याकडील भाजीपाला आणि फळं यांच्या उत्पादनाचे क्लस्टर काढण्यासाठी त्याला नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळाच्या दृष्टिकोनातून निधी मिळावा, याबाबतीत देखील चव्हाण यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत भारत सरकारचे पत्र राज्य सरकारकडे देण्याची तरतूद केली आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 720 किमीच्या किनारपट्टीमध्ये सागरमाला 2 अंतर्गत काही हजार कोटींचा निधी मागवला आहे. मंत्री नितेश राणे यांच्याशी माझी चर्चा झाली. यात सागरमाला 2 मध्ये जे काही प्रकल्प प्रस्तावित आहेत, या संदर्भात माझी सोनवाल यांच्याशी भेट झाली, अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिली आहे. सुनील तटकरे पुढे बोलताना म्हणाले, आपल्याकडे काही अल्पसंख्यांक जिल्हे म्हणून घोषित झाले आहेत. या संदर्भात मी किरेन रिजीजू यांची भेट घेतली आहे. त्यांना निवेदन देऊन माझ्या मतदारसंघातील जो काही प्रस्ताव मांडला आहे, त्याला मान्यता देण्याची विनंती केली आहे. या संदर्भातील नवीन योजना लवकरच येत आहे. प्रशांत किशोर आणि सुनेत्रा पवारांच्या भेटीवर काय म्हणाले तटकरे? तसेच प्रशांत किशोर यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली होती. या संदर्भात प्रश्न विचारला असता सुनील तटकरे म्हणाले, प्रशांत किशोर यांनी सुनेत्रा वहिनी यांची औपचारिक भेट घेतली आहे. त्यांची सल्लागार म्हणून नेमणूक केली असती तर मला समजले असते. पण तसे काही नाहीये. तसेच शरद पवार साहेबांना एकेका जिल्ह्यातील 10-12 सदस्यांची नावे माहीत होती. अजितदादा सुद्धा अनेकांना ओळखत होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष रुजण्यासाठी सरव्हे केला जातो. यात काही वावगे नाही. आता आम्ही सगळे त्याच पद्धतीने काम करत आहोत.
Source link
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सदिच्छा भेट:सुनील तटकरेंचे स्पष्टीकरण, मुंबई-गोवा महामार्गावरील टोल बंद करण्याची गडकरींकडे मागणी