Headlines

पत्राचाळ प्रकरणात जेलमध्ये जाऊन आलेले संजय राऊत '420':त्यांनी गृहमंत्र्यांवर बोलू नये, तेवढी त्यांची लायकी नाही- नीतेश राणे




पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात तुरुंगात जाऊन आलेला संजय राऊत स्वतः 420 आहे आणि खिचडी घोटाळ्यात पैसे खाणाऱ्या या व्यक्तीची देशाच्या गृहमंत्र्यांवर टीका करण्याची लायकी नाही, अशा शब्दांत भाजप नेते नीतेश राणे यांनी राऊतांवर टीका केली आहे. आपण घरात सुरक्षित आहोत कारण अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत. त्यांचे अभिनंदन करण्यासाठी रस्त्यावर उतरले पाहिजे. प्रत्येकाला आंदोलन करण्याचे स्वतंत्र आहे. आम्ही कोणाला कशावर आंदोलन करा किंवा करू नये असे सांगू शकत नाही. नीतेश राणे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुटुंबप्रमुख म्हणून घेतलेली भूमिका अत्यंत कौतुकास्पद आहे. दिल्लीमध्ये जंतरमंतवर झालेल्या आंदोलनात मोदी आणि त्यांच्या मातोश्रींवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका झाली, तरीही त्यांनी दाखवलेला मनाचा मोठेपणा हा भारतीय म्हणून आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. आपल्या देशाचे नेतृत्व अशा एका जबाबदार आणि सुसंस्कृत नेत्याच्या हाती आहे, याचा मला सार्थ अभिमान वाटतो. सुसंस्कृतपणाचे सल्ले मातोश्रीवर द्यावे नीतेश राणे म्हणाले की, संजय राऊत यांचे मालक उद्धव ठाकरे जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते, तेव्हा कोरोनाच्या काळात आरोग्य यंत्रणेच्या अभावामुळे असंख्य लोकांचे बळी गेले. त्या काळात पत्रकार बांधवांवर खोट्या केसेस दाखल केल्या गेल्या आणि समाजात तेढ निर्माण करण्याचे काम झाले. या सर्व प्रकाराबद्दल उद्धव ठाकरे यांनी जनतेसमोर नाक रगडून माफी मागायला हवी होती, पण त्यांच्याकडून तशी अपेक्षा ठेवणे व्यर्थ आहे. हा संस्काराचा विषय असतो. राऊतांनी सुसंस्कृतपणाचे हे सल्ले मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर जाऊन द्यावेत, असा खोचक सल्लाही त्यांनी दिला. शहांवर बोलण्याची हिंमत करू नका गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यादरम्यान कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आल्यावरून संजय राऊत यांनी तुम्ही मुळचे गुंड आहात, एकतर गुंडासारखे वागा नाहीतर गृहमंत्र्यांसारखे वागा अशी बोचरी टीका केली होती, या टीकेला प्रत्युत्तर देताना नीतेश रोण म्हणाले की, संजय राऊत हे स्वतः एक 420 आहेत. पत्राचाळ घोटाळ्यात तुरुंगात गेलेल्या आणि खिचडी घोटाळ्यात पैसे खाणाऱ्या माणसाने देशाच्या गृहमंत्र्यांवर बोलण्याची हिमंत करू नये.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *