![]()
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक रविवारी ७ जूनला पक्षाच्या कार्यक्रमानिमित्त शहरात आले होते. रात्री साडेनऊ ते दहा वाजताच्या सुमारास कार्यक्रम आटोपल्यानंतर त्यांनी अचानक शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाला भेट देत पाहणी केली. या वेळी त्यांनी बस स्थानकातील स्वच्छता व्यवस्था, चालक-वाहकांच्या विश्रांतीगृहाची स्थिती जाणून घेतली. बसस्थानकातील अस्वच्छता, चालक-वाहकांची गैरसोय या समस्यांवरून मंत्री सरनाईक संतप्त झाले. त्यांनी विभागीय वाहतूक नियंत्रक आणि बस स्थानक व्यवस्थापक यांच्या निलंबनाच्या सूचना एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या. या कारवाईमुळे परिवहन विभागात मोठीखळबळ उडाली आहे. परिवहन मंत्रीप्रताप सरनाईक यांचा ताफा रात्रीसाडेनऊ ते पावणेदहाच्या दरम्यान मध्यवर्ती बस स्थानकात दाखल झाला. सुरुवातीला त्यांनी सार्वजनिक स्वच्छतागृहाची पाहणी केली. तेथील अस्वच्छता पाहून त्यांनी तीव्र नाराजीव्यक्त करत उपस्थित अधिकाऱ्यांनाजाब विचारला. ‘स्वच्छतेसाठीकंत्राटदारांवर मोठा खर्च केला जातो,मग प्रत्यक्षात स्वच्छता का दिसतनाही?’ असा सवाल त्यांनी केला. यानंतर मंत्री सरनाईकबसस्थानकाच्या पहिल्यामजल्यावरील चालक-वाहकांच्या विश्रांतीगृहात गेले. तेथे उपस्थित चालक-वाहकांशी चर्चा करताना अनेक समस्या त्यांच्या निदर्शनास आल्या. नव्या गाद्या त्यांच्या भेटीच्या काही तासांपूर्वीच उपलब्ध करून देण्यात आल्याचे चालक-वाहकांनी सांगितले. याशिवाय विश्रांतीगृहातील स्वच्छतागृहांचा वापर बाहेरील व्यक्तींकडून होत असल्याने तेथील परिस्थितीही अत्यंत वाईट असल्याचे समोर आले. या प्रकारामुळे मंत्री सरनाईक यांनी विभागीय वाहतूकनियंत्रक सचिन डफळे यांना धारेवरधरत तत्काळ स्पष्टीकरण मागितले. त्यानंतर त्यांनी मुंबई स्थित एसटीमहामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनादूरध्वनीवरून संपर्क साधून विभागीय वाहतूक नियंत्रक आणि अमरावती मध्यवर्ती बसस्थानक, व्यवस्थापक यांना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्याच्या सूचना दिल्या.चालक-वाहक तसेच प्रवाशांच्यासुविधांबाबत कोणतीही हयगय सहनकेली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला. दर चार तासांनी बसस्थानकाची स्वच्छता व्हायलाच पाहिजे ^प्रवाशांना आवश्यक सुविधा देणे ही महामंडळाची जबाबदारी आहे. बसस्थानक परिसराची दर चार तासांनी स्वच्छता झालीच पाहिजे. चालक-वाहकांसाठी विश्रांतीगृहात योग्य व्यवस्था, प्रवाशांसाठी थंड पिण्याचे पाणी उपलब्ध असणे आवश्यक आहे. कंत्राटदारांकडून कामाची काटेकोर अंमलबजावणी करून घेतली पाहिजे. मात्र येथे या सर्व बाबींचा अभाव आढळून आला. त्यामुळे दोन अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत. – प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री.
Source link
परिवहन मंत्र्यांकडून बसस्थानकाची आकस्मिक पाहणी:अस्वच्छतेसह चालक-वाहक विश्रांतीगृहातील गैरसोयीवरून संतप्त, अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश