Headlines

भूखडांचे बनावट कागदपत्र तयार करून खऱ्या मालकालाच फसवण्याचा प्रयत्न:बनवेगिरी उघड करण्यासाठी‎लंडन कनेक्शन ठरले महत्वाचे‎




नांदगाव पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मौजे बोरगाव धर्माळे येथे हायवे टच १९,५१२ वर्गफुट भूखंडांचे बनावट दस्तऐवज एकाने तयार केले. त्याचे बाजारमुल्य जवळपास ३ कोटी आहे. या बनावट दस्तऐवजाच्या आधारे आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार करुन न्यायालयात त्याने याचिका दाखल केली. मात्र हा प्रकार भुखंडाचा मालक व या भुखंडाचे मुख्यत्यारपत्र ज्याच्या नावे आहे, त्यांना माहिती झाला. कारण त्या दोघांनाच या बनावट कागदपत्राच्या आधारे फसवण्याचा प्रयत्न झाल्याचे पोलिस तक्रारीत नमूद केले. हा प्रकार समोर आल्यानंतर भुखंडाचे मुख्त्यारपत्र ज्याच्या नावे आहे, त्यानेच ही बनवेगिरी करणाऱ्याविरुद्ध तक्रार केली. या प्रकरणात नांदगाव पेठ पोलिसांनी चौकशीअंती त्याच्याविरुद्ध शनिवारी ७ जूनला गुन्हा दाखल केला. तिलकराज इंद्रजित चढ्ढा (रा. भंडारा रोड, नागपूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणात विनोद मोहन गुहे (४५, रा. गोकुळपेठ, नागपूर) यांनी नांदगाव पेठ पोलिस ठाण्यात तक्रार केली. तक्रारीनुसार, विनोद गुहे हे नागपूर जिल्ह्यातील खापा येथे फॅक्टरी चालवतात. त्यांचे आतेभाऊ डॉ. शशांक वसंतराव गुर्जर हे सध्या लंडन येथे कॅन्सर सर्जन म्हणून कार्यरत आहेत. डॉ. गुर्जर हे दीर्घकाळापासून परदेशात वास्तव्यास असल्याने त्यांनी अमरावती येथील त्यांच्या मालकीच्या मालमत्तेचे व्यवहार पाहण्यासाठी विनोद गुहे यांच्या नावे ३१ जानेवारी २०२३ रोजी अधिकृत मुखत्यारपत्र करून दिले होते. या अधिकारानुसार गुहे हे संबंधित मालमत्तेची देखभाल व व्यवहार पाहत होते.हा प्रकार मौजे बोरगाव धर्माळे येथील १९५१२.५ स्क्वेअर फूट क्षेत्रफळाचे दोन भूखंड जे डॉ. शशांक गुर्जर यांनी वैयक्तिक उपयोगासाठी राखून ठेवले होते. त्याबाबतीत घडला आहे. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, ६ जुलै २०२५ रोजी आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणातील तक्रारदार विनोद गुहे यांना फोन आला. त्यावेळी त्यांना सांगितले कि, तिलकराज चढ्ढा यांनी तुमच्याविरुद्ध (गुहे) संबंधित प्रॉपर्टीत फसवणुकीबाबत तक्रार अर्ज केला. या चौकशीच्या अनुषंगाने जेव्हा गुहे अमरावतीत आले, तेव्हा त्यांना माहिती मिळाली. चढ्ढाने पोलिसांत तक्रारीसह येथील न्यायालयात याच संदर्भात दिवाणी दावा दाखल केला. त्यामुळे विनोद गुहे यांनी न्यायालयातून संबंधित दाव्याच्या प्रमाणित कॉपी मिळवल्यात. त्यात ७ जुलै २०२४ रोजीच्या ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर विक्रीचा करारनामा, जमिनीच्या विकास व्यवहाराचे दोन दस्तऐवज आढळले. मात्र ते गुहे यांना संशयास्पद वाटत होते. या प्रकरणात तिलकराज चढ्ढाने सुमारे तीन कोटीच्या भुखंडाचे खोटे व बनावट दस्तऐवज तयार केले. हे दस्तऐवज खरे भासवून विनोद गुहे व भुखंडाचे मालक डॉ. शशांक गुर्जर यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार दिली. त्यावरुन नांदगाव पेठ पोलिसांनी तिलकराज चढ्ढाविरुद्ध फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. चढ्ढाने न्यायालयात केलेल्या दाव्यात ७ जुलै २०२४ च्या ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर जमीन मालक डॉ. गुर्जरच्या स्वाक्षरीचा दावा केला होता, मात्र डॉ. गुर्जर हे मुंबई विमानतळावर होते. तिथून त्यांनी लंडनसाठी उड्डाण केले होते. तक्रारदार गुहेंनी पोलिसांना विमान प्रवासाची तिकिटे, इमिग्रेशन चेक इनच्या पुराव्याने बनावट दस्तऐवजांचे बिंग फुटले चढ्ढाने न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यात जी कागदपत्रे जोडली, त्यात करारनामा जोडला होता. त्या करारनाम्यासाठी वापरलेल्या स्टॅम्पवर स्टॅम्प खरेदी करणाऱ्याचे नाव नव्हते, तसेच तो नोटराईज्ड केला नव्हता. या करारनाम्यावर असलेल्या डॉ. शशांक गुर्जर आणि विनोद यांचे वडील मोहन सहदेव गुहे यांच्या स्वाक्षऱ्या बनावट असल्याचे लक्षात आले. तसेच ज्या दिवशी म्हणजेच ७ जुलै २०२४ रोजी हा करारनामा तयार केल्याचा दावा चढ्ढाने केला आहे, त्या दिवशी डॉ. शशांक गुर्जर हे मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर होते व त्याच दिवशी त्यांचे लंडनसाठी विमान होते. त्यांच्या विमान प्रवासाची तिकिटे आणि इमिग्रेशन चेक-इनच्या छायांकित प्रतीसुद्धा विनोद गुहे यांनी पोलिसांना दिल्या आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *