Headlines

पाचोडमध्ये घराचा स्लॅब भरताना खाली पडून 24वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू:स्लॅबच्या कडेला उभे असताना संतुलन बिघडले, छाती, डोक्याला गंभीर मार‎



येथील शिवाजीनगर भागात घराचा स्लॅब भरण्याचे काम सुरू असताना एका २४ वर्षीय तरुणाचा तोल जाऊन खाली पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (१२ जून) दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. प्रदीप मुकेश पिंपळे (रा. पाचोड) असे मृताचे नाव आहे.

.

प्रदीप पिंपळे यांचे कुटुंब तीस वर्षांपासून पाचोड येथे वास्तव्यास असून, बिगारी व प्लंबिंगच्या कामातून उदरनिर्वाह करत होते. प्रदीप हे वडिलांसोबत बांधकाम क्षेत्रातील विविध कामांमध्ये हातभार लावत होते. शिवाजीनगर भागातील संतोष मेहतर यांच्या घराचे स्लॅब भरण्याचे काम सुरू होते. शुक्रवारी चारच्या सुमारास प्रदीप हे इतर कामगारांसोबत स्लॅब भरण्यात व्यस्त होते. काम सुरू असताना सिमेंटने भरलेला गाडा सांभाळत असताना अचानक त्यांचा तोल गेला. स्लॅबच्या कडेला उभे असताना संतुलन बिघडल्याने ते थेट खाली कोसळले. पडताना त्यांच्या डोक्याला आणि छातीला गंभीर मार लागला. सहकारी कामगारांनी प्रदीप यांना पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी तपासणी करून मृत घोषित केले. या प्रकरणाची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. प्रदीप पिंपळे हे वडीलांना बांधकाम तसेच प्लंबिगच्या कामामध्ये मदत करीत होते. मागील ३० वर्षांपासून ते पाचोडला कुटूंबासोबत राहत होते. मात्र, शुक्रवारी शिवाजीनगर येथे सुरू असलेल्या बांधकामावर स्लॅब टाकताना त्यांचा तोल गेल्याने ते खाली कोसळल्याने मृत्यूमुखी पडले.

प्रदीप यांच्या घरामध्ये दहा दिवसांपूर्वीच मुलीचा जन्म मृत प्रदीप यांना दहा दिवसांपूर्वीच कन्यारत्न प्राप्त झाले होते. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते. मात्र, शुक्रवारी घडलेल्या घटनेमुळे कुटूंबावर शोककळा पसरली आहे. प्रदीप यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगी, भाऊ असा परिवार आहे. रात्री ९ वाजता प्रदीप यांच्यावर पाचोड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *