- Marathi News
- National
- In SIR, The Blurred Photos On The Cards Of 30 Crore Voters Will Be Removed, The House Number Will Not Have ’00’, The Address Will Be Recorded
मुकेश कौशिक | नवी दिल्ली51 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक

निवडणूक आयोग मतदारांची घराघरांत जाऊन पडताळणी करण्याच्या अंतिम टप्प्यात जातील. आता उर्वरित ३९ कोटी ७३ लाख मतदारांच्या दारावर पोहोचण्याची तयारी सुरू आहे. दरम्यान, स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (एसआयआर) नंतर मतदार फोटो ओळखपत्र (ईपिक) मध्ये कोणते मोठे बदल झाले याची भास्करने पडताळणी केली.
पहिल्या टप्प्यात बिहारमध्ये आणि दुसऱ्या टप्प्यात १२ राज्यांतील मतदारांची घरोघर जाऊन पडताळणी केल्यानंतर ५९ कोटी मतदारांची नवीन ओळखपत्रे तयार केली आहेत. त्यातील मोठा बदल म्हणजे छायाचित्र. यापूर्वीच्या सुमारे ३० टक्के मतदार ओळखपत्रांच छायाचित्रच नव्हते किंवा असे धूसर होते की ओळख पटवणे कठीण होते.
यामागील कारण म्हणजे संविधानात फोटो ओळखपत्राचा उल्लेखच नाही. त्यामुळे मतदाराला छायाचित्र देण्यासाठी बंधनकारक करता येत नव्हते. पडताळणीत सुमारे ३० कोटी छायाचित्रे गायब, धूसर, जुनी किंवा ओळख पटणार नाहीत अशी असल्याचे आढळले. अनेक छायाचित्रे २० ते ३० वर्षे जुनी होती.
एसआयआरनंतर आतापर्यंत तयार केलेल्या ५९ कोटी मतदारांच्या छायाचित्रांत आता अद्ययावतच नव्हे तर रंगीत छायाचित्रांचा समावेश आहे. आयोगाच्या ९ लाख २० हजारांहून अधिक बूथ लेव्हल अधिकाऱ्यांनी मोबाइलद्वारे मतदारांचे छायाचित्र, ओळखपत्र यांची सांगड घालून मतदार यादी अधिक अचूक व स्वच्छ केली. यासाठी बीएलओंनी कोणतेही शुल्क घेतले नाही. आता मतदाराच्या पत्त्यात घर क्रमांक ‘००’ नोंदवला जाणार नाही. त्याऐवजी अचूक पत्ता असेल.
२.६ लाख बनावट मतदार हटवले; २ ठिकाणी नाव गुन्हा
1. एसआयआर मोहिमेमुळे यादीत काय बदल झाला?
सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे आता एकापेक्षा अधिक मतदारसंघ किंवा ठिकाणी आपले नाव ठेवू शकणार नाही. या मोहिमेत मतदारांना सध्याचे निवासस्थान निवडण्याची मुभा दिली. इतर सर्व जुने पत्ते नावे वगळण्यात आली.
2. एखाद्याचे नाव अनेक ठिकाणी असल्यास काय ?
आयोगाने कठोर निर्देश दिले आहेत. एसआयआरदरम्यान सर्वांना चूक सुधारण्याची संधी दिली होती तरीही एखाद्या मतदाराचे नाव एकापेक्षा अधिक ठिकाणी आढळल्यास तो आता गंभीर गुन्हा ठरेल. योग्य ती कारवाई केली जाईल.
3.बनावट किंवा दुहेरी मतदारांची ओळख पटवण्यासाठी कोणती श्रेणी तयार केली आहे?
यासाठी आयोगाने ‘एएसडीडी’ श्रेणी तयार केली.याचा अर्थ ‘अब्सेंट, शिफ्टेड, डुप्लिकेट, डिकीज्ड’ असा आहे. म्हणजे अनुपस्थित, स्थलांतरित, दुहेरी ओळखपत्र वा मृत मतदार.
4. आतापर्यंत किती डुप्लिकेट ओळखपत्रे हटवली?
या प्रक्रियेमुळे आतापर्यंत मतदार यादीतून २.६ लाख डुप्लिकेट ईपिक क्रमांक पूर्णपणे वगळण्यात आले आहेत.
5.संशयित मतदार शोधण्यासाठी कोणते तंत्रज्ञान? आयोगाने ‘फोटो सिमिलर इलेक्टर’ आणि ‘डेमोग्राफिकली सिमिलर इलेक्टर’ यांसारखी अत्याधुनिक विश्लेषणात्मक सॉफ्टवेअर साधने वापरली. ही साधने एकसारखी नोंदी तत्काळ ओळखू शकतात.
6. मतदान टक्केवारीवर याचा काय परिणाम होईल?
मृत, अनुपस्थित आणि बनावट मतदारांची नावे यादीतून काढून टाकल्याने आता फक्त वास्तविक आणि सक्रिय मतदारांची नोंद राहील. आगामी निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी अधिक अचूक आणि तुलनेने जास्त दिसू शकते.
7. उमेदवारांसाठी हे कसे उपयुक्त ठरेल? यामुळे उमेदवारांना प्रत्यक्ष त्या भागात राहणाऱ्या मतदारांपर्यंत पोहोचणे सोपे होईल. त्यांना वास्तविक मतदारांची अधिक अचूक यादी उपलब्ध होईल.