Headlines

सत्ता, पैशांद्वारे परस्पर संबंधांची तुलना केल्यामुळेच दुरावा- विष्णू महाराज:कन्नड येथील हनुमान मंदिरात श्रीमद् भागवत कथा सप्ताहाची सांगता‎




संत कबीरांनी सब पैसे के भाई, अपना साथी कोई नहीं असे जगाचे वर्णन केले आहे. जग कमालीचे व्यावहारिक झाले आहे. सत्ता, पैशांद्वारे परस्पर संबंधांची तुलना माणसा-माणसांत दुरावा निर्माण झाला आहे, असे प्रतिपादन विष्णू महाराज काळे यांनी भोलेश्वर कॉलनीतील हनुमान मंदिरात श्रीमद् भागवत कथा सप्ताहाच्या सांगता प्रसंगी शुक्रवारी केले. भोलेश्वर कॉलनी येथे श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विष्णू महाराज काळे यांनी श्रीकृष्ण व गरीब सुदामा यांच्यातील मैत्री व आजच्या माणसातील संबंधावर सुरेल वाणीने निरूपण केले. ते म्हणाले, श्रीकृष्ण द्वारकाधीश झाल्यानंतर त्यांचा गरिबीत जगणारा बालमित्र सुदामा यांच्यातील मैत्रीत जिव्हाळा कधीच आटला नाही. गरीब लोक दररोज मरण जगतात. त्यांचे दुःख हलके करण्यासाठी श्रीमंतांनी पुढे येण्याची गरज आहे. सत्ता, पद, पैसा असलेल्यांना सगळेच नातलग समजतात, सांगतात. गरिबांचे नातलग कोणीच नसतात. अहंकार नसलेल्यांशी मैत्री करा. चांगला मित्र संकटात आपल्याला निराश होऊ देत नाही. समाजातून मैत्रीभाव संपुष्टात येत आहे. त्यामुळे माणसांवर, नात्यांवर प्रेम करा म्हणजे आपण हा भवसागर तरून जाऊ. यावेळी नगरसेवक अब्दुल जावेद यांनी भागवत कथेत सहभागी होऊन सत्संगाचा लाभ घेतला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, सत्ता, पद, प्रतिष्ठा हे तात्कालिक असते. श्रीकृष्ण, सुदामा यांच्या कथेतून हा दृष्टांत दिला आहे. एकेकाळी मला दूर लोटणारे आता नगराध्यक्ष झाल्यापासून कार्यक्रमाला यावे म्हणून आग्रह करत आहे. पद,पैसा, सत्ता पाहून माणसांना मोजू नये. यावेळी शेखर मांडे, विजय मांडे, नगरसेवक बंटी सुरे, गोकुळ राठोड, विजय सिरसाठ, प्रकाश काळे यांनी विष्णू महाराज काळे यांचा सत्कार केला. याप्रसंगी विमल ठोंबरे,बाळासाहेब ठोकळ, संजय भुयागळे, विनोद साबळे, अण्णा पवार, गंगा वाघ, वंदना वारे ,अनुसया भीमराव पाटील, सोनम गायकवाड, नगरसेवक गायत्री काळे, शशिकला भुयागळे, जनाबाई वंजारी, विजाबाई गायकवाड, आकाश बोलधने, अश्विनी बोलधने आदूींसह मोठ्या संख्येने पंचक्रोशीतील भाविक उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *