Headlines

उमराणे ग्रामपंचायतीच्या आरक्षण सोडतीत तयार यादीवरून गोंधळ:चिठ्ठी पद्धतीऐवजी थेट आरक्षण वाचनावर विलास देवरे यांचा आक्षेप‎



स्थानिक राजकारणाचे केंद्रबिंदू ठरलेल्या उमराणे ग्रामपंचायतीच्या १७ सदस्यांच्या प्रभागनिहाय आरक्षण सोडतीदरम्यान गुरुवारी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पारदर्शक पद्धतीने चिठ्ठ्या काढून आरक्षण जाहीर होईल, या अपेक्षेने विशेष ग्रामसभेला मोठ्या संख्येने ग

.

या प्रकारानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विलास देवरे यांनी तहसीलदार मनोहर कुलकर्णी यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला. “चिठ्ठी पद्धतीने सोडत काढायची नव्हती, तर ग्रामसभा कशासाठी बोलावली?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या चर्चेत माजी सभापती धर्मा देवरे, बाळासाहेब देवरे, ग्रामपंचायत सदस्य संदीप देवरे, सचिन देवरे, प्रदीप देवरे आदी ग्रामस्थ सहभागी झाले. दरम्यान, यंदा उमराणे ग्रामपंचायतीत प्रथमच थेट सरपंच निवडणूक होत असून सरपंचपद अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. त्यातच प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झाल्याने अनेक इच्छुकांची राजकीय गणिते बदलली असून, प्रशासनाच्या या कार्यपद्धतीबाबत ग्रामस्थ पुढे कोणती भूमिका घेतात, याकडे परिसराचे लक्ष लागले आहे.

जाहीर करण्यात आलेले प्रभागनिहाय आरक्षण प्रभाग क्र. १ (३ जागा) : अनुसूचित जमाती, अनुसूचित जमाती (महिला), सर्वसाधारण, प्रभाग क्र. २ (३ जागा) : अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), सर्वसाधारण, प्रभाग क्र. ३ (३ जागा) : अनुसूचित जाती (महिला), नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्र. ४ (२ जागा) : सर्वसाधारण, सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्र. ५ (३ जागा) : नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), सर्वसाधारण, सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्र. ६ (३ जागा) : नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण, सर्वसाधारण (महिला).



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *