Headlines

पाचोडला बुद्ध जयंतीनिमित्त मिरवणूक:भगवान बुद्धांच्या मूर्तीची रथातून ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक




प्रतिनिधी | पाचोड तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त पैठण चौकात भगवान बुद्धांच्या मूर्तीला भिक्खू ग्यानरिक्षित थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली अभिवादन केले. सभापती राजू नाना भुमरे, जिल्हा परिषद सदस्य शिवराज भुमरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन पंडित, मनोज नरवडे यांच्या हस्ते पूजन झाले. यानंतर भगवान बुद्धांच्या मूर्तीची रथातून ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. भिक्खू ग्यानरिक्षित थेरो यांच्या हस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संघगिरी महास्तूप, संघगिरी महाविहार, आडगाव जावळे येथील भिक्खू संघाची उपस्थिती होती. भिक्खू संघाच्या उपस्थितीत तक्षशिला बौद्ध विहारातील भव्य भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीचे रितीरिवाजाप्रमाणे पूजन झाले. बुद्धवंदना, त्रिसरण, पंचशील, परित्राण पाठ घेण्यात आला. उपस्थित बौद्ध उपासक-उपासिकांना उपसोत प्रवचन देण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते लेखराज जैस्वाल यांच्या माध्यमातून खीरदान, भोजनदान करण्यात आले. कार्यक्रमाला लेखराज जैयस्वाल, अंकुश मस्के, राजू खरात, भारत शेळके, मोहन उघडे, वैजिनाथ घनघाव, दत्ता शेळके, विशाल म्हस्के, विशाल मोरे, प्रकाश म्हस्के, सुहास म्हस्के, सुधीर म्हस्के, बाळू शेळके, विलास मगरे, दिलीप बनकर यांच्यासह उपासक-उपासिका उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *