Headlines

पात्र नागरिकांसाठी उद्यापासून 2दिवस सर्व मतदान केंद्रांवर विशेष नोंदणी शिबिरे:अर्जांवर दावे-हरकतींसाठी ऑफलाइन 12ऑक्टोबरपर्यंतची मुदत




राज्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाने मतदार यादीत एकही पात्र मतदार वंचित राहू नये तसेच कोणत्याही अपात्र व्यक्तीचे नाव यादीत राहू नये, याची खात्री करण्यासाठी विशेष उपाययोजनांची घोषणा केली आहे. मसुदा मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांची ओळख पटवण्यासाठी विशेष घरभेट मोहीमही राबवली जात आहे. बीएलओ पात्रतेची पडताळणी केल्यानंतर अशा नव्या मतदारांकडून नमुना क्रमांक ६ भरून घेत आहेत. पडताळणीसाठी बीएलओ घरी आले असताना उपलब्ध नसलेल्या पात्र नागरिकांसाठी १० आणि ११ ऑक्टोबर रोजी सर्व मतदान केंद्रांवर विशेष मतदार नोंदणी शिबिरे आयोजित केली जाणार आहेत.तरुण मतदारांसाठी ५ ते ९ ऑक्टोबरदरम्यान महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये मतदार नोंदणी शिबिरे आयोजित केली गेली. दावे-हरकती ऑफलाइन कालावधी १२ ऑक्टोबरला संपणार आहे. विरोधी पक्षांच्या आंदोलनादरम्यान उपाययोजना मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकनात अनियमितता झाल्याचा आरोप करत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. या मागणीवरून विरोधकांचे मोठे आंदोलन सुरू असतानाच या उपाययोजना जाहीर करण्यात आल्या आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *