![]()
चौंढाळा येथील जगदंबा विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे पैठण तालुका क्रीडा कार्यालयाशी संयुक्तपणे आयोजित तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धांचा उत्साहात प्रारंभ झाला. आमदार विलास भुमरे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. तालुक्यातील ११० शाळांच्या संघांनी यात सहभाग नोंदवल्याने मैदानावर क्रीडाप्रेमींना कबड्डीचा थरार पाहायला मिळत आहे. उद्घाटनप्रसंगी बोलताना आमदार भुमरे म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा क्षेत्रात मोठी गुणवत्ता असून अशा स्पर्धांमुळे त्यांना योग्य व्यासपीठ मिळते. खेळाडूंनी शिस्त व खिलाडूवृत्ती जपत तालुक्याचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य नितीन तांबे, आप्पासाहेब निर्मळ, रवींद्र काळे, मुकेश काला, आफसर शेख, अतुल पन्हाळकर, सुनील डुकरे, दीपक गाभुड, पांडुरंग पवार आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सोमनाथ टाक, लक्ष्मण सपकाळ, प्रशांत नरके, इम्तियाज शेख आणि रखे परिश्रम घेत आहेत. दरम्यान, अधिकृत पत्र देऊनही आरोग्य विभागाचा एकही कर्मचारी मैदानावर उपस्थित राहिला नाही. त्यामुळे जखमी खेळाडूंवर खासगी दवाखान्यात उपचार करावे लागल्याची तीव्र नाराजी प्राचार्य प्रशांत नरके यांनी व्यक्त केली.
Source link
चौंढाळा येथे कबड्डी स्पर्धेत 110 संघांनी घेतला सहभाग