![]()
कर्जाची विवंचना आणि शेतात उभे असलेले मक्याचे पीक वाया गेल्याच्या नैराश्यातून सावरखेडा (ता. सोयगाव) येथील ४९ वर्षीय शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली. चंद्रकांत सखाराम नवगिरे (४९, रा. सावरखेडा) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. चंद्रकांत नवगिरे यांनी कर्जाच्या नैराश्यातून बुधवारी विष प्राशन केले. यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून व पाच मुली असा परिवार आहे. या प्रकरणी फर्दापूर ठाण्यात नोंद केली आहे. ८५ हजार रुपयांचे कर्ज चंद्रकांत नवगिरे यांनी शेतीसाठी सोसायटीकडून ८५ हजार कर्ज घेतले होते. शेतात त्यांनी मक्याची पेरणी केली होती; मात्र पिकाला कणसेच न आल्याने उत्पादन हातात येण्याची शक्यता मावळली होती. सोसायटीचे कर्ज आणि बियाणे, खते व औषधांची मोठी उधारी, ही देणी कशी फेडायची या चिंतेत असल्याने त्यांनी आत्महत्या केली.
Source link
कर्जाच्या विवंचनेतून सावरखेडा येथील शेतकऱ्याची आत्महत्या:विषारी औषध प्राशन करून उचलले टोकाचे पाऊल