Headlines

पारोळ्यात अतिवृष्टीनंतर पंचनामे सुरू:महसूल विभागाकडून बांधावर जाऊन पाहणी‎




रत्नापिंप्री शेळावे महसूल मंडळात ३१ जुलै रोजी झालेल्या मुसळधार अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून आता रत्नापिंप्रीसह दबापिंप्री, होळपिंप्री, नेरपाट व भिलाली परिसरातील बाधित शेतीचे पंचनामे प्रत्यक्ष सुरू करण्यात आले आहेत. महसूल विभागाने थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी सुरू केल्याने हवालदिल झालेल्या बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. ३१ जुलै रोजी झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे परिसरातील अनेक शेतांमधील पिके पाण्याखाली गेली होती. तसेच पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे सुपीक माती वाहून जाऊन उभी पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. या आपत्तीची दखल घेत प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्यानुसार महसूल अधिकारी जितेंद्र जोगी, कोतवाल समाधान धनगर, संदीप पाटील, भिकनराव पाटील, अजित पाटील यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व नुकसानग्रस्त शेतकरी बांधावर उपस्थित होते. तातडीने भरपाई मिळण्याची मागणी शेतातील नुकसानीची नोंद घेण्याचे काम वेगाने सुरू असून, प्रशासनाने सर्व पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करून बाधित शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक भरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे. नुकसानीचे पंचनामे करताना अधिकारी व सोबत शेतकरी.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *