Headlines

पारंपारिक आयुर्वेद ते आधुनिक क्लिनिकल चाचण्यांचे मार्गदर्शन:विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व अत्याधुनिक प्रयोगशाळा उपकरणांचे केले वितरण‎




अहमदनगर महाविद्यालयातील वनस्पतिशास्त्र विभाग, जॉन बार्नबस पदव्युत्तर जैवशास्त्र विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयुर्वेद, आरोग्य विज्ञान व क्लिनिकल चाचण्या या विषयांवर व्याख्यान व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमातून आयुर्वेदातील पारंपरिक ज्ञानाचा आधुनिक संदर्भ, क्लिनिकल चाचण्यांचे नियोजन, संशोधनाची शास्त्रीय पद्धत आणि संशोधन प्रकाशनाच्या विविध टप्प्यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे सचिव विशाल बार्नाबास यांच्या हस्ते झाले. यावेळी प्राचार्य प्रा. डॉ. अभिजित कुलकर्णी, उपप्राचार्य प्रा. डॉ. भालसिंग, प्रा. डॉ. नाबदे व प्रा. डॉ. बेदरकर उपस्थित होते. जैवविज्ञान विभागाचे मानद सल्लागार डॉ. मनोहर फुर्ताडो, डॉ. सदाशिव लोणकर आणि डॉ. प्रियांका थोलार यांच्या हस्ते संशोधन क्षेत्रात कार्यरत विद्यार्थ्यांना प्रत्येकी रुपये २५ हजार शिष्यवृत्ती आणि प्रयोगशाळेतील उपकरणांचे वितरण करण्यात आले. यामध्ये अनुजा भालेराव, रिजवान खान, गोविंद निकम (प्राणीशास्त्र विभाग), सदाफ सय्यद (वनस्पतिशास्त्र विभाग) आणि लिकू डेव्हासे (रसायनशास्त्र विभाग) यांचा समावेश होता. वैज्ञानिक संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ. अविनाश वंजारे, डॉ. प्रशांत कटके, डॉ. राजेश टाक आणि डॉ. सनी रुपवते यांचा विशेष गौरव करण्यात आला. डॉ. वंजारे व डॉ. कटके यांनी ब्रेकिओपॉड्स विषयक संशोधनात महत्त्वपूर्ण शोधनिबंध प्रकाशित करून संशोधन अनुदान प्राप्त केले. डॉ. राजेश टाक आणि डॉ. सनी रुपवते यांनी जैवशास्त्र विभागातील केंद्रीय उपकरण सुविधा केंद्रासाठी अत्याधुनिक उपकरण खरेदीसाठी क्रोमॅटोग्राफी सोसायटी ऑफ इंडियाकडून अनुदान मिळविले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *