![]()
मराठा आरक्षण आंदोलक संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांचे २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या निर्णायक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर माढा शहरात आयोजित करण्यात आलेल्या भव्य इशारा बैठकीला सकल मराठा समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सभेसाठी सहा तासांहून अधिक उशीर होऊनही हजारोंच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते. मराठा आरक्षणासह समाजहिताच्या विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी माढा शहरातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक मराठी शाळेच्या मैदानावर या इशारा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. माढा, माळशिरस, बार्शी आणि करमाळा या चार तालुक्यातील सकल मराठा समाजाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. दुपारी वाजता सभेचे नियोजन होते. मात्र दुपारी २ वाजल्यापासूनच आंदोलक शहरात दाखल होण्यास सुरुवात झाली. माढा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जरांगे-पाटील यांच्या सत्कारासाठी सुमारे ६ जेसीबीची रांग लावण्यात आली होती. मराठा बांधवांच्या जेवणासाठी शहरातील विविध ठिकाणी समाजाच्या वतीने भोजन आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. संपूर्ण परिसर भगवामय झाल्याचे चित्र होते. संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या इशारा बैठकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाच्या वतीने कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यासाठी ७ पोलिस अधिकारी, ४५ पोलिस अंमलदार, ३७ स्वयंसेवक आणि १५ पोलिसांचे दंगा नियंत्रण पथक तैनात करण्यात आले होते. अन्यथा २९ ऑगस्टला लाखोंनी जमावे हैदराबाद गॅझेटसह कुणबी प्रमाणपत्रांचा मुद्दा उर्वरित कुणबी जात प्रमाणपत्रांचे वाटप करा अन्यथा २९ ऑगस्टला अंतरवाली सराटीत लाखोंच्या संख्येने उपस्थित राहा हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी तसेच उर्वरित कुणबी जात प्रमाणपत्रांचे वाटप सरकारने करावे, अशी मागणी मनोज जरांगे-पाटील यांनी केली. या मागण्यांबाबत सरकारने ठोस निर्णय न घेतल्यास येत्या २९ ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी येथे सकल मराठा समाजाने लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी वैराग येथील सभेत केले. ७ अधिकारी, ४५ पोलिस अंमलदार मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर जोरदार टीका करत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा साधला. ‘बावनकुळे यांनी मराठ्यांच्या नादी लागू नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना समज द्यावी, असे आवाहन जरांगे-पाटील यांनी वैराग येथे केले. मराठा समाजाच्या मागण्यांकडे सरकारने गांभीर्याने पाहिले नाही, तर आगामी काळात सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी दिला. ‘मराठा समाज सरकार पाडायला कमी करणार नाही, असेही जरांगे-पाटील यांनी स्पष्ट केले. शिरसाटांना समज देण्याची एकनाथ शिंदेंकडे मागणी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून सरकारमधील नेत्यांना इशारा देताना जरांगे-पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मंत्री संजय शिरसाट यांना समज देण्याची मागणी केली. ‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना जात पडताळणीच्या नोंदी शोधण्याचे काम करण्यात आले. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारही व्यक्त केले आहेत. मात्र, आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजीनगरचे मंत्री संजय शिरसाट यांना समज द्यावी,’ असे जरांगे-पाटील म्हणाले. यावेळी बार्शी तालुक्यासह वैराग परिसरातील सुमारे दहा हजार मराठा सेवक भगव्या टोप्या परिधान करून मोटारसायकल रॅलीत सहभागी झाले होते.
Source link
बावनकुळेंना समज द्यावी, सरकारही पाडायला कमी करणार नाही- जरांगे:मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा