Headlines

पिंपरी-चिंचवडमध्ये प्लास्टिक कंपनीला आग:अग्निशमन दलाच्या 10 गाड्या दाखल, आगीवर नियंत्रणासाठी मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू




पिंपरी-चिंचवड शहरातून आगीची एक भीषण घटना समोर आली आहे. चिंबळी फाटा परिसरातील एका प्लास्टिक कारखान्याला आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. प्लास्टिकच्या साहित्यामुळे आगीने काही वेळातच अत्यंत रौद्र रूप धारण केले असून, संपूर्ण परिसरात काळ्याकुट्ट धुराचे ढग पसरले आहेत. या अचानक उद्भवलेल्या संकटामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या.अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने, या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, ही दिलासादायक बाब आहे. मात्र, आग लागली तेव्हा कारखान्यात काही कामगार अडकले होते का, याचा शोध प्रशासनाकडून घेतला जात आहे. कारखान्याला आग नेमकी कशी आणि कोणत्या कारणाने लागली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अग्निशमन दल आणि स्थानिक पोलिसांकडून घटनास्थळी बचावकार्य वेगाने सुरू आहे. …हे वृत्त आम्ही अपडेट करता आहोत



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *