Headlines

पुणे फेस्टिव्हलच्या अध्यक्षपदी कृष्णकुमार गोयल:मीरा कलमाडी चेअरपर्सन, डॉ. सतीश देसाई सेक्रेटरी निवड




पुण्याचे नाव जागतिक पर्यटन नकाशावर नेणाऱ्या पुणे फेस्टिव्हलचे संस्थापक अध्यक्ष खा. सुरेश कलमाडी यांच्या निधानानंतर पुणे फेस्टिव्हलच्या विश्वस्तांची पहिली बैठक मंगळवारी संपन्न झाली. त्यामध्ये कै. सुरेश कलमाडी यांना श्रद्धांजली वाहून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. विश्वस्तांच्या या बैठकीत पुणे फेस्टिव्हलच्या अध्यक्षपदी कृष्णकुमार गोयल, चेअरपर्सन पदी मीरा कलमाडी, व सेक्रेटरीपदी डॉ. सतीश देसाई यांची एकमताने निवड करण्यात आली. प्रख्यात अभिनेत्री, नृत्यांगना खा. हेमा मालिनी पुणे फेस्टिव्हलच्या पॅट्रन आहेत. यासोबतच सुभाष सणस (उपाध्यक्ष), अॅड. अभय छाजेड (मुख्य संयोजक) आणि डॉ. सतीश देसाई यांच्याकडे सेक्रेटरी पदाबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रम मुख्य संयोजक या पदांची फेरनिवड करण्यात आली. पुणे फेस्टिव्हलचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार सुरेश कलमाडी यांनी गेले ३७ वर्षे सार्वजनिक गणेशोत्सव काळात पुणे फेस्टिव्हल सातत्याने भव्यतेने साजरा करीत पुण्याचे नाव जगाच्या पर्यटन नकाशावर नेले. आता त्यांच्या पश्चात हा वारसा जोपासत अशाच भव्यतेने पुणे फेस्टिव्हल सादर करण्याची मोठी जबाबदारी आपल्यावर आहे आणि सर्व विश्वस्त समितीप्रमुख आणि कार्यकर्ते यांची मेहनत आणि श्रीगणेशाचे आशीर्वाद यातून हा वारसा निश्चित जोपासला जाईल अशा भावना याप्रसंगी सर्वांनी व्यक्त केल्या. यंदा दिनांक १४ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ३८ वा पुणे फेस्टिव्हल साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये देशभरातील अनेक नामवंत कलाकार सहभागी होऊन आपली कला सादर करत असतात.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *