Headlines

पुण्याच्या कुख्यात आंदेकर टोळीतील कोयता गँगचा दरोड्याचा डाव उधळला:आर्मी इंटेलिजन्सकडून टीप, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई‎




पुणे येथील कुख्यात आंदेकर टोळीतील कोयता गँगचा अहिल्यानगरमध्ये दरोडा टाकण्याचा डाव स्थानिक गुन्हे शाखेने उधळून लावला. बुऱ्हाणनगर रोडवरील मिरावली पहाड पायथ्याजवळ ही कारवाई केली.यात पाच आरोपींना जेरबंद केले. त्यांच्याकडून ४ गावठी कट्टे, १० जिवंत काडतुसे, कोयता, चाकू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. भिंगार येथील बुऱ्हानगर रोडवरील मिरावली पहाडाच्या पायथ्याजवळ काही इसम कट्ट्यासह दरोडा घालण्याच्या तयारीत थांबले असल्याची माहिती २६ मे रोजी मिलिट्री इंटेलिजेन्सकडून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने छापा टाकला असता त्यातील एक जण पळून गेला. पोलिसांनी पाठलाग करून ४ जणांना ताब्यात घेतले. कोंढवा (पुणे) येथील मुस्ताक ईक्राहीम शेख (वय २२ वर्षे), विराट उर्फ विल्यम रविंद्र मेहंदळे (वय २६ वर्षे), समर्थ बाबासाहेब माडळकर (वय १९ वर्षे) आणि समर्थ राजेंद्र दुधभाते (वय १८ वर्षे) यांचा यात समावेश आहे. पळून गेलेल्या आकाश संजय पवार (रा. ब्रम्हतळे, भिंगार) यालाही पथकाने शोध घेऊन ताब्यात घेतले.न्यायालयाने पुण्याच्या चार आरोपींना ३ दिवसांची कोठडी सुनावली. ताब्यातील आरोपींवर मोक्कासह पुण्यात गंभीर गुन्हे पुणे येथील आरोपी कुख्यात आंदेकर टोळीतील असून त्यांच्यावर खून, खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. समर्थ बाबासाहेब मांडळकर आणि समर्थ राजेंद्र दुधभाते यांच्यावर पुणे शहरातील कोंढवा पोलिस ठाण्यात सात गंभीर गुन्हे दाखल आहेत. दोघाही आरोपींवर पुणे येथे महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्यानुसार गुन्हा दाखल आहे. तसेच, भिंगार येथील आकाश संजय पवार याच्यावर यापूर्वीही भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *