![]()
पुणे शहरातील मंगळवार पेठेत अनैतिक संबंधातून एका महिलेने तरुणावर चाकूने वार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी महिलेसह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये रेश्मा रज्जाक शेख (वय ४०), रुखसार जावेद कोडगनुर (वय २३) आणि सोहेल रज्जाक शेख यांचा समावेश आहे. हे तिघेही भराव वस्ती, जुन्या बाजाराजवळ, मंगळवार पेठ येथे राहणारे आहेत. एका तरुणाने या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रेश्मा आणि तक्रारदार तरुण यांचे गेल्या १६ वर्षांपासून अनैतिक संबंध होते. तक्रारदार तरुण रेश्माला नियमितपणे खर्चासाठी पैसे देत असे. अलीकडेच, आरोपी रेश्माने तिच्या एका मित्राला दुचाकी वापरण्यास दिली होती. या कारणावरून रेश्मा आणि तक्रारदार यांच्यात वाद झाला. या वादानंतर रेश्माने तरुणाला शिवीगाळ केली आणि त्याच्या गालावर चाकूने वार केला. फिर्यादीनुसार, रेश्माची विवाहित मुलगी आणि तिच्या साथीदारानेही तरुणाला शिवीगाळ करून मारहाण केली.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार एस. खिलारे करत आहेत. दागिने चोरीप्रकरणी घरकाम करणाऱ्या महिलांविरुद्ध गुन्हा दाखल घरकाम करणाऱ्या महिलांनी वेगवेगळ्या घटनेत दोन लाख रुपयांचे दागिने लांबविल्याची घटना घडली. या प्रकरणी चतु:शृंगी आणि वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. बाणेर-पाषाण रस्त्यावरील एका सदनिकेत घरकाम करणाऱ्या महिलेने एक लाख २५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एकाने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या सदनिकेत काम करणाऱ्या एका महिलेने कपाटातून एक लाख २५ हजारांचे दोगिने लांबविले. महिला पसार झाल्याचे लक्षात आल्यनंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक उमेश काेळी तपास करत आहेत. वानवडीत एका सदनिकेत काम करणाऱ्या महिलेने ८० हजार रुपयांची सो्न्याची अंगठी चोरुन नेली. याबाबत एकाने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार एस क्षीरसागर तपास करत आहेत.
Source link
पुण्यात अनैतिक संबंधातून हिंसक वाद:तरुणावर चाकूने वार, तिघांविरुद्ध गुन्हा