Headlines

"पोलिसांवरील दगडफेक भाजपच्याच गुंडांनी केली":अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप, पोलिसांच्या दुटप्पी भूमिकेवरही सवाल उपस्थित




कॉकरोच जनता पक्षाच्या आंदोलनात जखमी झालेल्या दिल्ली पोलिस आणि सुरक्षा दलांच्या कुटुंबीयांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी सांगितले की पोलिसांवर देखील दगडफेक झाली. एका पोलिस जवानाच्या मुलीने सांगितले की, ‘माझे वडील जेव्हा घरी यायचे, तेव्हा म्हणायचे की आता हे विद्यार्थ्यांचे आंदोलन राहिलेले नाही, यात चुकीचे लोक सामील झाले आहेत. 20 जुलै रोजी माझ्या वडिलांचे सहकारी त्यांना रात्री 10 वाजता घरी घेऊन आले. त्यांच्या डोक्याला 5 टाके होते. त्यांचा गणवेश रक्ताने माखलेला होता, तरीही सोशल मीडियावर त्यांनाच गुन्हेगार ठरवले गेले.’ कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी पोलिसांवरील दगदफेकीवर प्रतिक्रिया दिली आहे. अभिजीत दिपके म्हणाले, जे एक महिन्यापासून तिथे आंदोलन करणारे सीजेपीचे विद्यार्थी आंदोलनकर्ते होते, त्यांनी हिंसा केलेली नाही. ज्यांनी कोणी मारामारी केली ते भाजपचे गुंड होते. पोलिसांसोबत जे झाले ते वाईटच झाले आहे. पण बघायला गेले तर दगड कोणी आणून ठेवले होते? दगडांनी भरलेला ट्रक कसा आला? हे सगळे काही भाजपच्या लोकांनी केले आहे आणि त्यांनीच पोलिसांवर दगडफेक केली आहे. आम्ही कोणत्याच हिंसेचे समर्थन करत नाही. जयणी दगडफेक केली त्यांच्यावर कारवाई करू शकता, पण ज्या विद्यार्थ्यांनी काहीच केले नाही त्यांना का त्रास दिला जात आहे? असा सवाल दिपके यांनी उपस्थित केला आहे. कोणाच्या इशाऱ्यावर पोलिस तेव्हा शांत होती? पुढे बोलताना अभिजीत दिपके म्हणाले, विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवण्यात आली, बिहारमध्ये एके-47 चालवण्यात आली. पोलिस यासाठी पोलिस भरतीमध्ये जातात का? ज्या लोकांनी दगडफेक केली त्यांना अटक करा. भाजपच्या गुंडांनी येऊन 15 दिवसांपूर्वी निशू नावाची मुलगी आहे तिच्या वडिलांचे डोके फोडले, याच पोलिसांनी त्यांना अटक केली नाही. जेव्हा मी त्यांना विचारले की त्यांना अटक का करत नाही, त्यावर त्यांनी सांगितले की आम्ही असेच कोणालाही अटक करू शकत नाही, त्यानंतर या गुंडांनी व्हिडिओ बनवला, “अभी तो एक को मारा हें, शाम को आऊंगा तो और मारुंगा”, असे त्यांनी त्यात म्हटले होते. तेव्हा पोलिस गप होते. कोणाच्या इशाऱ्यावर पोलिस तेव्हा शांत होती? असा संतप्त सवाल दिपके यांनी केला आहे. विद्यार्थ्यांचे डोक्यात लाठ्या घालताना लाजा नाही वाटल्या? विद्यार्थ्यांचे डोक्यात लाठ्या घालताना लाजा नाही वाटल्या? खिळे लावले होते त्या लाठ्यांना, तेव्हा तुम्हाला लाजा नाही वाटल्या, 12-12 वर्षांच्या मुलींचे कपडे फाडले, त्यांच्या डोक्यात लाठ्या घातल्या पोलिसांनी. पुरुष पोलिसांनी मुलींचे कपडे फाडून मारले, असा आरोप अभिजीत दिपके यांनी केला आहे. या संदर्भातील ही देखील बातमी वाचा ‘वडील घरी आले तेव्हा गणवेश रक्ताने लाल झाला होता’:जंतर-मंतरवर जखमी पोलिसांचे कुटुंबीय म्हणाले- आंदोलनात विद्यार्थी नव्हते, गुंड होते कॉकरोच जनता पक्षाच्या आंदोलनात जखमी झालेल्या दिल्ली पोलीस आणि सुरक्षा दलांच्या कुटुंबीयांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले- 20 तारखेनंतर हेच कथन पसरवले जात आहे की विद्यार्थ्यांना पोलिसांनी मारहाण केली, पण आंदोलनाचा दुसरा भाग काही वेगळाच आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *