Headlines

पुण्यात उद्या भाजपची तिरंगा रॅली:ललित महल ते गरवारे चौक मार्गावर वाहतुकीत बदल, 'या' मार्गांचा वापर करण्याचे पोलिसांचे आवाहन




‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत पुणे शहरात मंगळवारी (11 ऑगस्ट) तिरंगा गौरव समिती, पुणे यांच्या वतीने तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिली. यामुळे भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होण्याची शक्यता आहे. ही रॅली दुपारी 2 वाजता ललित महल हॉटेल चौकातून सुरू होईल आणि गरवारे चौकात समाप्त होईल. ललित महल हॉटेल चौक, ज्ञानेश्वर महाराज पादुका चौक, तुकाराम महाराज पादुका चौक, गुडलक चौक आणि गरवारे चौक असा या रॅलीचा मार्ग निश्चित करण्यात आला आहे. हा असेल पर्यायी मार्ग रॅलीच्या कालावधीत या मार्गावरील वाहतूक आवश्यकतेनुसार तात्पुरती बंद करून पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे. विशेषतः, खंडोजी बाबा चौक ते गुडलक चौक हा मार्ग रॅली संपेपर्यंत बंद ठेवण्यात येईल. स्वारगेटकडून पुणे विद्यापीठाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांनी अलका चौक, खंडोजी बाबा चौक, वीर सावरकर चौक, ना. सी. फडके चौक, मांगिरबाबा चौक, सेनादत्त चौक, बालशिवाजी-महात्रे पूल, नळस्टॉप आणि लॉ कॉलेज रस्त्याचा वापर करावा, असे वाहतूक पोलिसांनी सूचित केले आहे. त्याचप्रमाणे, स्वारगेटहून खडकी किंवा जुन्या पुणे-मुंबई महामार्गाकडे जाणाऱ्या वाहनांसाठीही पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. नागरिकांनी रॅलीच्या काळात शक्यतो पर्यायी मार्गांचा वापर करून वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. रॅलीच्या पार्श्वभूमीवर पुणे वाहतूक पोलिसांकडून प्रमुख चौक आणि मार्गांवर चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *