Headlines

पुण्यात घोरपडी पेठ पोलिस चौकीजवळ गोळीबार:एक तरुण जखमी, संशयित हल्लेखोर ताब्यात




घोरपडी पेठ पोलिस चौकीजवळ दुचाकीवरून आलेल्या दोघांनी एका तरुणावर गोळीबार केल्याची घटना घडली. या घटनेत ख्वाजाउद्दीन नाजीर शेख ऊर्फ नुरू शेख हा तरुण जखमी झाला आहे. त्याच्या पाठीला गोळी लागली असून, त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती आहे. प्राथमिक माहितीनुसार, सुजल सुनील परदेशी आणि त्याचा एक साथीदार दुचाकीवरून घोरपडी पेठ परिसरात आले होते. त्यांनी नूर शेख याच्यावर तीन राऊंड गोळीबार केला. अचानक झालेल्या गोळीबारामुळे परिसरात घबराट निर्माण झाली. विशेष म्हणजे, ही घटना पोलिस चौकीच्या जवळच घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली. गोळीबारानंतर दोन्ही हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संशयित हल्लेखोर सुजल सुनील परदेशी याला पळून जात असताना ताब्यात घेतले. त्याच्या साथीदाराचा शोध सुरू असल्याची माहिती आहे. जखमी नूर शेख हा पुण्यातील गणेश पेठ परिसरात राहणारा आहे. त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टरांकडून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यास सुरुवात केली आहे. गोळीबारामागील नेमके कारण आणि आरोपींचा उद्देश अद्याप स्पष्ट झालेला नाही. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पदके रवाना झालेली आहे. पूर्व वैमानस्यातून हा प्रकार घडला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *