Headlines

पुण्यात प्रथमच मराठीत गोकथेचे आयोजन:ह.भ.प. परेश बुवा देवळणकर: गोमातेशी मानवाचे जन्मजन्मांतराचे नाते




ग्रंथ पारायण दिंडी, पुणे आणि गीताधर्म मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सदाशिव पेठेतील गीताधर्म मंडळ येथे प्रथमच मराठीत गोकथेचे आयोजन करण्यात आले आहे. या गोकथेचे निरूपण ह.भ.प. परेश बुवा देवळणकर करत आहेत. गोमातेशी मानवाचे जन्मजन्मांतराचे नाते असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. कथेच्या पहिल्या दिवशी कपिला गायीचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी ग्रंथ पारायण दिंडीचे वीरेंद्र कुंटे, गीताधर्म मंडळ अध्यक्ष प्राचार्य डॉ. मुकुंद दातार, वे.मु. ओमकार सप्रे आदी उपस्थित होते. याप्रसंगी गोशाळांचे व्यवस्थापन व गोसेवेचे कार्य निष्ठेने चालविणाऱ्या गोशाळा संचालकांचा सन्मान करण्यात आला. तसेच विविध गोशाळांना आर्थिक मदत व देणग्यांचे वितरणही करण्यात आले. आपले सर्व ज्ञान वेदांमधून आले असून, वेद समजणे अवघड असल्याने पुराणांचा अभ्यास आवश्यक आहे, असे ह.भ.प. परेश बुवा देवळणकर यांनी सांगितले. अठरा पुराणे आणि चार वेद यांमध्ये अनेक विषयांचा ऊहापोह असला तरी, गोमातेचे महत्त्व हा सर्व पुराणांमधील समान धागा आहे, असे ते म्हणाले. देवळणकर बुवांनी विविध पुराणांतील गोमातेच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. ब्रह्मपुराणात गोमातेमध्ये सर्व देवतांचा वास असून ती पवित्र व सर्व पापांचा नाश करणारी असल्याचे वर्णन आहे. पद्मपुराणात सर्व तीर्थांचे स्वरूप गोमातेमध्ये असल्याचे सांगून गाईची सेवा करण्याचे महत्त्व सांगितले आहे. विष्णुपुराणातही गोमातेचे महत्त्व वर्णन केले असून, शिवपुराणात गोहत्येला ब्रह्महत्येसमान महापाप मानले आहे. गाईची सेवा हे परम पुण्य असून तोच खरा धर्म असल्याचे विविध पुराणांमध्ये सांगितले आहे. मार्कंडेय पुराणात धर्म टिकवण्यासाठी गाईंचे रक्षण करण्याचा संदेश देण्यात आला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *