![]()
गणेशोत्सवाच्याआधी पुण्यात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाई केली आहे. बुधवार पेठ परिसरात एफडीएच्या पथकाने पनीर आणि खव्याने भरलेले चार ट्रक जप्त केले. हा साठा मोठ्या प्रमाणात असल्याने कारवाईसाठी अनेक अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते. गणेशोत्सवात मिठाई, मोदक, पेढे आणि इतर खाद्यपदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढते. या पदार्थांमध्ये खवा आणि पनीरचा वापर जास्त असतो. त्यामुळे या काळात दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ होण्याची शक्यता असते. हे लक्षात घेऊन एफडीएने विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. बुधवार पेठेत केलेल्या कारवाईत चार ट्रकमधील पनीर आणि खव्याचा साठा जप्त करण्यात आला. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी या पदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. प्रयोगशाळेतील अहवाल आल्यानंतरच या खाद्यपदार्थांचा दर्जा, गुणवत्ता आणि त्यामध्ये भेसळ आहे की नाही, हे स्पष्ट होईल. हा एवढा मोठा साठा पुण्यात कुठून आणला, त्याचा पुरवठादार कोण आहे आणि तो कोणत्या ठिकाणी वाटला जाणार होता, याचा तपास सुरू आहे. हा साठा परराज्यातून पुण्यात आणल्याचा सुरुवातीचा संशय आहे. याचीही पडताळणी केली जात आहे. गणेशोत्सवात नागरिक मोठ्या प्रमाणात मिठाई आणि दुग्धजन्य पदार्थ खरेदी करतात. त्यामुळे खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी एफडीएची ही कारवाई महत्त्वाची आहे. नमुन्यांचा अहवाल आल्यानंतर दोषींवर पुढील कारवाई केली जाईल. हेही वाचा.. दगडूशेठ गणपतीचा यंदाचा गणेशोत्सव प्रेम मंदिराच्या प्रतिकृतीत:सोमवारी प्राणप्रतिष्ठा, 35 हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण; भाविकांसाठी आरोग्यसेवेचे कवच श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या १३४व्या गणेशोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. यंदा वृंदावन येथील प्रसिद्ध ‘प्रेम मंदिरा’ची भव्य प्रतिकृती गणेशोत्सवाचे मुख्य आकर्षण असेल. गणेश चतुर्थीला सोमवारी (१४ सप्टेंबर) सकाळी ११.११ वाजता श्रींची प्राणप्रतिष्ठापना होईल. सायंकाळी ७ वाजता महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते विद्युत रोषणाईचे उद्घाटन केले जाईल. सविस्तर वाचा
Source link
पुण्यात FDAची मोठी कारवाई:बुधवार पेठेत 4 ट्रक पनीर-खवा जप्त, गणेशोत्सवाआधी भेसळीविरोधात धडक मोहीम