![]()
पुणे पोलिसांनी अवैध बांगलादेशी नागरिकांविरुद्ध सुरू ठेवलेली शोधमोहीम तीव्र केली असून, फरासखाना पोलिसांनी बुधवार पेठ परिसरात पुन्हा मोठी कारवाई केली आहे. या मोहिमेत अवैधरीत्या वास्तव्य करणाऱ्या ५ बांगलादेशी महिलांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त ऋषिकेश रावले यांनी पदभार स्वीकारल्यापासून गेल्या ११ महिन्यांत एकूण ९४ बांगलादेशी नागरिकांना विविध कारवायांमध्ये अटक करण्यात आली आहे. तपास पथकाने ११ मे रोजी रात्री १ ते सकाळी ९ या वेळेत बुधवार पेठ येथील रेड लाइट एरियात “कोम्बिंग ऑपरेशन’ राबवले. या कारवाई दरम्यान, माचीस बिल्डिंगमध्ये काही बांगलादेशी महिला विनापरवाना राहत होत्या. ही कारवाई पुढेही अशीच सुरू राहणार आहे. सीमेवरून घुसखोरी करून वेश्याव्यवसाय पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत असे समोर आले की, या महिलांनी बांगलादेश सीमा अवैधरीत्या ओलांडून भारतात प्रवेश केला होता. उदरनिर्वाहासाठी त्या बुधवार पेठ परिसरात वेश्याव्यवसाय करत होत्या. त्या बांगलादेशी असल्याचे पुरावे प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली.
Source link
पुण्यामध्ये 11 महिन्यांत 94 बांगलादेशी अटकेत:फरासखाना पोलिसांची पुन्हा धडक कामगिरी