![]()
नाशिक जिल्ह्यात भूकंपाचे सत्र सुरूच असून शनिवारी (दि. ८) रात्री १०.०१ ते रविवारी (दि. ९) पहाटे ५.३३ वाजेपर्यंत भूकंपाचे ४ धक्के बसले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या नोंदीनुसार तिन्ही भूकंपांची तीव्रता २.९ ते ४.३ रिश्टर स्केलदरम्यान होती. चारही भूकंपांची खोली ५ किमी होती. पहिला धक्का शनिवारी रात्री १०.०१ वाजता बसला त्याची तिव्रता ४.३ रिश्टर इतकी होती. दुसरा धक्का पहाटे १.३४ वाजता बसला. त्याची तीव्रता ३.१ रिश्टर होती. त्यानंतर अवघ्या आठ मिनिटांनी १.४३ वाजता तिसरा २.९ रिश्टर तीव्रतेचा धक्का बसला. त्यानंतर पहाटे ५.३३ वाजता ३.३ रिश्टर तीव्रतेचा तिसरा धक्का बसला. या भूकंपांचे केंद्र नाशिकच्या उत्तर-पश्चिम परिसरात असल्याचे समोर आले आहे. अवघ्या ७ तासांत चार भूकंपाचे धक्के नोंदवले गेल्याने परिसरातील भूकंपाच्या हालचालींकडे लक्ष लागले आहे. पेठ, कळवणला मध्यम स्वरूपाचे धक्के 1. महाराष्ट्र-गुजरातच्या सीमावर्ती भागात बेसॉल्ट खडकाचे थर एकमेकांवर घासल्यामुळे ही कंपने निर्माण होत आहेत.
2. १७ जुलैला नाशिकमध्ये २४ तासांत १६४ मिमी मुसळधार पाऊस पडला. ते पाणी भेगांमधून खोलवर झिरपले.
3. या दाबामुळे भूगर्भात ५ किमी खाली स्प्रींगसारखा ताण आल्याने या हालचाली जाणवत असल्याचे राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राचा प्राथमिक अंदाज आहे.
4. सुरगाण्यात ५० किमीच्या अंतरावर अधिक सूक्ष्म नोंदी घेणारे सिस्मोग्राफ यंत्र बसवले आहे. अत्यंत कमी खोली हे सर्व भूकंप भूपृष्ठापासून अवघ्या ५ ते १० किमी खोलीवर होत आहेत. भूकंप जितका उथळ तितकी त्याची ऊर्जा भूपृष्ठावर तीव्रतेने जाणवते. सुरगाणा, पेठ व कळवण भागात सलग लहान धक्के बसत आहेत. खडक स्वतःला स्थिर करताना ऊर्जेचे हे छोटे उत्सर्जन काही आठवडे सुरू राहू शकते. फ्लुइड पोर प्रेशर जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील मुसळधार पावसामुळे सह्याद्रीच्या खडकांमधील भेगांमधून पाणी अत्यंत खोलवर झिरपत साचल्यामुळे तेथे ‘फ्लुइड पोर प्रेशर’ वाढले आहे. या पाण्यामुळे अंतर्गत खडकांमधील घर्षण कमी होते, ज्यामुळे खडक एकमेकांवरून घसरतात व कंपने निर्माण होतात. फॉल्ट लाइन सक्रिय बेसॉल्ट खडकांच्या खाली प्राचीन काळातील अनेक भूगर्भीय भेगा दडलेल्या आहेत. भारतीय टेक्टॉनिक प्लेट सातत्याने उत्तर दिशेला सरकत असल्याने अंतर्गत खडकांवर दाब निर्माण होतो, ज्यामुळे गुजरात-महाराष्ट्र सीमेवरील जुन्या ‘फॉल्ट लाइन्स’ पुन्हा सक्रिय झाल्या आहेत.
Source link
पुन्हा हादरा:नाशिकमध्ये सात तासांत भूकंपाचे 4 धक्के; सर्वात मोठा 4.3 रिश्टरचा, 25 जुलैपासून 22 हादरे, ऑगस्ट महिन्यात बसले 10 धक्के