![]()
नागपूरच्या ताजबाग परिसरातील एका मदरशामध्ये १० अल्पवयीन विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सक्करदरा पोलीस ठाण्यात मदरशातील शिक्षकावर बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पॉक्सो) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
.
मध्य प्रदेशातून अरेबिक आणि उर्दू भाषेचे शिक्षण घेण्यासाठी आलेला एक १६ वर्षीय विद्यार्थी या मदरशात राहात होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ जून रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास मुले झोपेत असताना आरोपी शिक्षक अताय रसूल ऊर्फ तालिफ (वय २६, रा. आझाद कॉलनी) याने मुलांच्या खोलीत जाऊन या विद्यार्थ्यावर अत्याचार केला. मुलाने विरोध केला असता त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.
तक्रारीनंतर आरोपीबाबत व्यवस्थापनाचा हलगर्जीपणा, कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
पीडित मुलाने दुसऱ्या दिवशीच मदरसा व्यवस्थापकाला या घटनेची माहिती दिली होती. मात्र, व्यवस्थापनाने पोलिसांत तत्काळ तक्रार न करता आरोपीला केवळ फटकारले. यामुळे आरोपीला पळून जाण्यास वेळ मिळाला. अल्पसंख्याक आयोगाच्या पथकाने हस्तक्षेप करेपर्यंत हा प्रकार पोलिसांपर्यंत पोहोचला नव्हता. यावरून मदरशातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.