![]()
ठाण्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप ऊर्फ बाळू पूर्णेकर यांच्या निर्घृण हत्येने संपूर्ण ठाणे शहर हादरले आहे. या दुःखाच्या प्रसंगी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज थेट ठाण्यात धाव घेत पूर्णेकर कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत, “जे कोणी गुन्हेगार आहेत त्यांना फासावर लटकवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही,” असा थेट इशारा दिला आहे. ‘आम्ही पूर्ण ताकदीने सोबत आहोत’ प्रदीप पूर्णेकर यांच्या जाण्याने पूर्णेकर कुटुंबावर आणि पक्षावर मोठा आघात झाला आहे. उद्धव ठाकरे यांनी पूर्णेकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी अत्यंत भावुक झालेल्या कुटुंबीयांना धीर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “या दुःखाच्या काळात तुम्ही एकटे नाहीत. संपूर्ण शिवसेना आणि आम्ही पूर्ण ताकदीने पूर्णेकर कुटुंबीयांसोबत उभे आहोत. पूर्णेकर हे पक्षाचे एकनिष्ठ आणि लढवय्ये पदाधिकारी होते. त्यांच्या हत्येला जबाबदार असलेल्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही.” गुन्हेगारांना फाशीची मागणी या हत्येमागे राजकीय वर्चस्व आणि क्लस्टरच्या वादातून षड्यंत्र रचले गेल्याचा संशय व्यक्त होत आहे. यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. “कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. पण न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहील. जे कोणी या हत्याकांडाचे गुन्हेगार आणि मुख्य सूत्रधार आहेत, त्यांना फासावर लटकवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही,” अशी घणाघाती प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यांच्या या इशाऱ्यामुळे आता राज्य सरकार आणि पोलिसांवरील दबाव आणखी वाढला आहे. ठाकरे गटाचा आक्रमक लढा सुरूच प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर काल (बुधवारी) आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना जाब विचारला होता. त्यांच्या आक्रमक पवित्र्यानंतरच माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांचे नाव संशयित म्हणून पोलिसांच्या रेकॉर्डवर नोंदवण्यात आले. हत्येमागची संभाव्य कारणे प्रदीप पूर्णेकर हे कायम जनतेचे प्रश्न आक्रमकपणे मांडण्यासाठी ओळखले जायचे. गेल्याच महिन्यात त्यांनी अमली पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस उपायुक्तांना पत्र दिले होते. तसेच, मानपाडा येथील क्लस्टर योजनेवरूनही काही वाद सुरू होते. त्यामुळे या हत्येचा संबंध ड्रग्स माफिया किंवा क्लस्टरच्या वादाशी आहे का, याचा सखोल तपास करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात 3 महिला, 2 पुरुष ताब्यात; पप्या शिंदेशी संपर्क असल्याची माहिती प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून, पोलिसांनी आतापर्यंत ३ महिला आणि २ पुरुषांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या सर्वांचा हत्येपूर्वी संशयित आरोपी पप्या शिंदे याच्याशी संपर्क असल्याचे पोलिस तपासात समोर आल्याचे सांगितले जात आहे. पूर्णेकर यांची त्यांच्या कार्यालयात गोळीबार आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाच्या तपासासाठी ठाणे पोलिसांनी एकूण ९ पथके तयार केली असून, मुंबईसह मुंबईबाहेरील परिसरात आरोपींचा शोध सुरू आहे. प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण: आतापर्यंतच्या घडामोडींची टाइमलाइन ही बातमी पण वाचा.. प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण: ठाकरे गटाच्या आक्रमक पवित्र्यानंतर संशयितांची नावे जबाबात; हजारो समर्थकांच्या उपस्थितीत अखेरचा निरोप, मुलाची भावुक पोस्ट शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या निर्घृण हत्येचे तीव्र पडसाद बुधवारी शहरात उमटले. जे. जे. रुग्णालयातून पूर्णेकर यांचे पार्थिव कापूरबावडी पोलिस ठाण्यात आणल्यानंतर कुटुंबीय आणि हजारो समर्थकांनी तिथेच आक्रोश करत आंदोलन सुरू केले. या कठीण प्रसंगात प्रदीप पूर्णेकर यांचा मुलगा राम याने इन्स्टाग्रामवर वडिलांसोबतचा एक फोटो पोस्ट करून केवळ ‘पप्पा’ असे कॅप्शन देत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. सायंकाळी हजारो समर्थकांच्या उपस्थितीत पूर्णेकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सविस्तर वाचा
Source link
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण:गुन्हेगारांना फाशीची शिक्षा होईपर्यंत शांत बसणार नाही, उद्धव ठाकरेंचा इशारा