Headlines

प्रयागराजच्या जलाचा अभिषेक अन् महाआरती:शनिजयंतीला भाविकांची गर्दी, 13 वर्षांनंतर जुळून आला शनी अमावास्या-शनिजयंतीचा दुर्मिळ योग



तब्बल १३ वर्षांनंतर आलेला शनी अमावास्या आणि शनिजयंतीचा अत्यंत दुर्मिळ योग शनिवारी संपूर्ण भक्तिमय वातावरणात साजरा झाला. या महायोगाचे साक्षीदार होण्यासाठी देशभरातून २० तास २० मिनिटांच्या या पर्व काळात सुमारे ८ लाख भाविकांनी शनिशिंगणापूरमध्ये दर्शन घेत

.

यंदा भाविकांच्या संख्येत दुप्पट वाढ झाली आहे. उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले ते प्रयागराज, काशी आणि प्रवरासंगम येथून कावडीत पवित्र जल आणणाऱ्या ग्रामस्थांचे. शनिवारी दुपारी ११ वाजता शनिमूर्तीवर विधिवत जलाभिषेक करण्यात आला. यानंतर ठीक १२ वाजता मध्यान्ह आरती झाली. शनी चौथरा व परिसर आकर्षक फुलांनी आणि मनमोहक विद्युत रोषणाईने सजवले होते. अभिषेक करण्यासाठी मंदिर परिसरात मोठा मंडप उभारलेला होता. दर्शन रांगेसह मंदिर परिसरावर २०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर होती. सायंकाळी ७ वाजता राष्ट्रीय डेंटल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. राहुल हेगडे यांच्या हस्ते महाआरती झाली. तसेच झिम्बाब्वेचे उद्योगपती जयेश शहा व मुंबईचे व्यापारी सोनी यांच्या वतीने विश्वशांती यज्ञाचे आयोजन केले होते. दिल्ली आणि हरियाणा येथील भक्तांनी भाविकांसाठी मोफत भंडारा, फळे व सरबताचे वाटप केले. देवस्थानचे कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे व जनसंपर्क अधिकारी अनिल दरंदले यांनी नियोजन केले. मंदिरात प्रवेश व बाहेर पडण्यासाठी एकच मार्ग असल्याने काही काळ कोंडी झाली. सोनई-राहुरी रस्त्यावर ३ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. भुयारी दर्शनमार्गात पुण्याचे भाविक अतुल धोत्रे यांना उन्हाच्या काहिलीने भोवळ आली. प्रशासनाने त्यांना तातडीने उपचार केंद्रात दाखल केले.

उन्हामुळे ३५० मीटरची मॅट

कडक उन्हात भाविकांचे पाय भाजू नयेत म्हणून मंदिर प्रशासनाने मुख्य मंदिर परिसरात सुमारे ५५० मीटरची विशेष मॅट अंथरली होती. त्यावर पाणी टाकलेले होते. मुख्य दर्शन रांग भुयारी मार्गाने असल्याने भाविकांना दिलासा मिळाला. ठराविक संख्येने भाविकांना दर्शन रांगेत प्रवेश दिल्याने चेंगराचेंगरीचा प्रकार टळला.

व्हीआयपीदेखील रांगेमध्ये

चौथऱ्यावरून दर्शन बंद असल्याने माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार आनंदराव भोंढारकर, अमोल खताळ, विठ्ठलराव लंघे, सुनील शेळके, सुनील शिंदे, माजी आमदार शंकरराव गडाख, माजी सभापती सुनीताताई गडाख यांनीही सामान्यांप्रमाणेच रांगेतून दर्शन घेतले.

तेरा वर्षांपूर्वी ४.५ लाख भाविक

१३ वर्षांपूर्वी अशाच शनी अमावास्या व शनिजयंतीचा योग आला होता. तेव्हा सुमारे ४.५ लाख भाविक आले होते. यंदा हा आकडा दुपटीने ८ लाखांवर पोहोचला आहे. मागील शनी अमावास्येच्या तुलनेत यंदा पावणेसहा लाख अधिक भाविक आले. ८ लाख भाविकांनी शनिदेवाचरणी श्रद्धेने तेलाचा महाअभिषेक करून सुख-समृद्धीचे साकडे घातले.

लटकूंचा जाच कायम

प्रशासनाच्या पार्किंगपासून सुमारे २ किमी अंतर भाविकांना चालत यावे लागले. या गर्दीत काही दुचाकीस्वार लटकूंनी भाविकांना लिफ्ट देण्याच्या नावाखाली पैसे आकारत दुचाकीवर मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत सोडले. एका लटकूच्या दुचाकीने देवस्थानचे माजी कोषाध्यक्ष दीपक दरंदले यांना धडक दिल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *