Headlines

प्रायमाव्हर्सने 'ऑपव्याप' एआय प्लॅटफॉर्म विकसित केला:संस्थांच्या प्रकल्प, उत्पादकता आणि आर्थिक कामगिरीचे रिअल-टाइम निरीक्षण शक्य




संस्थांच्या प्रकल्पांचे व्यवस्थापन, कर्मचाऱ्यांची उत्पादकता, संसाधनांचा वापर आणि आर्थिक कामगिरी यांचे एकाच ठिकाणी रिअल-टाइम निरीक्षण करता यावे, यासाठी पुण्यातील प्रायमाव्हर्स संस्थेने ‘ऑपव्याप’ हा कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित क्लाऊड प्लॅटफॉर्म विकसित केला आहे. खासगी, सरकारी, निमसरकारी आणि सेवाभावी संस्थांना त्यांच्या कामकाजाची सद्यस्थिती आणि आर्थिक स्थितीची माहिती एकाच प्रणालीत उपलब्ध करून देणे, हा या प्लॅटफॉर्मचा उद्देश आहे. प्रायमाव्हर्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश देसाई यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सहसंस्थापिका ज्योती देसाई या वेळी उपस्थित होत्या. उत्तर अमेरिका, ब्रिटन, मॉरिशस आणि ऑस्ट्रेलियातील कंपन्यांसोबत काम करताना संस्थेला आलेल्या अनुभवातून ऑपव्याप विकसित करण्यात आला आहे. वाढत्या संस्थांमध्ये प्रकल्पांची स्थिती, मनुष्यबळाची उपलब्धता, कर्मचाऱ्यांची कामगिरी आणि आर्थिक व्यवहार यांची एकत्रित माहिती वेळेत मिळविण्याचे आव्हान असते. ही गरज लक्षात घेऊन प्रकल्प व्यवस्थापन, आर्थिक माहिती, संवादाची साधने आणि एआयवर आधारित विश्लेषण यांचा समावेश या प्लॅटफॉर्ममध्ये करण्यात आला आहे. ऑपव्यापच्या माध्यमातून प्रकल्प, विभाग, पथके आणि वैयक्तिक कर्मचाऱ्यांच्या कामगिरीवर लक्ष ठेवता येते. प्रकल्पांची सद्यस्थिती, कामासाठी लागलेला वेळ, संसाधनांचा वापर आणि कार्यक्षमता यांची माहिती उपलब्ध होते. तसेच महसूल, खर्च, नफा आणि प्रत्येक कर्मचाऱ्यामागील महसूल व नफा यांचे विश्लेषण करता येते. संस्थांना त्यांच्या गरजेनुसार माहितीचे फलकही बदलता येतात. “व्यवसायांमध्ये मोठ्या प्रमाणावर कार्यविषयक माहिती निर्माण होते; मात्र योग्य वेळी निर्णय घेण्यासाठी तिचा प्रभावी वापर करणे महत्त्वाचे आहे. ऑपरेशनल आणि आर्थिक माहिती एकाच पारदर्शक व्यासपीठावर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असे देसाई यांनी सांगितले. या प्लॅटफॉर्मचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा सुलभ वापर. कर्मचाऱ्यांना ३० सेकंदांपेक्षा कमी वेळेत कामाच्या वेळेची नोंद करता येते. ग्राहकांना ई-मेलद्वारे वारंवार माहिती मागविण्याऐवजी प्रकल्पांची सद्यस्थिती थेट पाहता येते. मोबाइल अॅप, संवाद सुविधा आणि स्वतंत्र ज्ञानकेंद्राचाही यात समावेश आहे. ऑपव्याप ऑनलाइन उपलब्ध असून, वैयक्तिक वापरकर्ते आणि संस्था या दोघांनाही त्याचा वापर करता येतो. वापरकर्त्यांची संख्या, संस्थेचा आकार आणि निवडलेल्या सुविधांनुसार या प्लॅटफॉर्मचे शुल्क निश्चित केले जाते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *