![]()
दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आणि शेतमजुरांच्या विविध मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (भाकप) आज नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. यात महाराष्ट्र राज्य किसान सभा आणि शेतमजूर संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. कॉम्रेड तुकाराम भस्मे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघाला. तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनात शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख दुष्काळी अनुदान, संपूर्ण कर्जमाफी, भूमिहीन शेतमजुरांना प्रती कुटुंब ५० हजार रुपये अनुदान, नियमित कर्जफेड करणाऱ्यांना २ लाख प्रोत्साहन अनुदान देण्याची मागणी केली. याशिवाय, बचत गटाचे कर्ज माफ करावे, शेती उत्पादनांना हमीभाव कायदा करावा आणि विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करावी अशा मागण्याही केल्या. सध्या शेतकरी आणि शेतमजूर मोठ्या आर्थिक संकटात आहेत.
Source link
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा नांदगाव खंडेश्वर तहसीलवर मोर्चा:दुष्काळी अनुदान, कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी किसान सभा, शेतमजूर युनियन सहभागी