![]()
मोर्शी येथे एका शेतकऱ्याच्या गाडीच्या डिक्कीतून २ लाख रुपये चोरीला गेल्याची घटना घडली. सोमवारी सकाळी ११.४५ वाजता पुनर्वसन कॉलनी परिसरात ही चोरी झाली. भाईपूर येथील सारंग पुरुषोत्तम खरापकर या शेतकऱ्याने पेरणीसाठी घेतलेले उसनवारीचे पैसे परत करण्यासाठी हे २ लाख रुपये बँकेतून काढले होते. त्यांचे वडील पुरुषोत्तम यांनी मोर्शी येथील भारतीय स्टेट बँकेतून पैसे काढले आणि सारंगला दिले. सारंगने हे पैसे इलेक्ट्रिक चेतक गाडीच्या डिक्कीत ठेवले. संबंधित व्यक्तीला पैसे देण्यासाठी तो निघाला होता. पुनर्वसन कॉलनी येथे गाडी थांबवून तो कामासाठी गेला असता, चोरट्यांनी डिक्की फोडून रक्कम पळवली. घटनेची तक्रार मोर्शी पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आली आहे. ठाणेदार राहुल आठवले यांनी पोलीस पथक घटनास्थळी पाठवले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन चोरटे कैद झाले आहेत. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
Source link
मोर्शीत शेतकऱ्याच्या गाडीच्या डिक्कीतून 2 लाख चोरी:बँकेतून काढलेले पैसे परतफेड करण्यासाठी जात असताना घटना, सीसीटीव्हीमध्ये 3 चोरटे कैद