Headlines

बळीराजाला दिलासा:राहुरीत रिमझिम पावसामुळे खरीप पिके तरारली




गुरुवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाच्या रिमझिम सरी दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिल्याने या पावसाने राहुरी तालुक्यातील पिकांना दिलासा मिळाला असून पिके हिरवीगार झाली आहेत. तालुक्यात आतापर्यंत मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम असताना रिमझिम पावसावर उभ्या पिकांना जिवदान मिळाल्याने शेतकरी रिमझिम पावसावर दिलासा मिळाल्याने सुखावला आहे. मुळा धरणातील आवक चांगली सुरू आहे. तालुक्यात यंदा शेतकऱ्यांनी पावसाच्या प्रतीक्षेत उशिरा खरिपाच्या पिकांच्या पेरण्या केल्याने यंदा खरीप हंगामाला उशीर झाला आहे. यात शेतकऱ्यांनी कपाशी, तूर, मका, सोयाबीन आदी पिकांच्या पेरण्या केल्या आहेत. पावसाची सुरुवात होत असताना धरणात नवीन पाण्याची आवक सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांनी उसाच्या लागवडी सुरू केल्या आहेत. तरीही ऊसाच्या लागवडी कमीच होतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. नदीकाठी दरवर्षी उसाच्या लागवडी मोठ्या प्रमाणात होत असताना यंदा शेतकऱ्यांनी याकडे दुर्लक्ष करून खरिपाच्या पेरण्या केल्या आहेत आता पावसाच्या आणि धरणाच्या आणि पाटपाण्याच्या अंदाजावर लागवडी करण्याचा शेतकऱ्याचा मानस असल्याचे सांगण्यात येत आहे. रिमझिम पावसामुळे शेतात तण वाढल्याने शेतकरी सध्या तणनाशकांचा वापर करून शेतातील तण काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मजुरांना पावसामुळे खुरपण्या तण काढण्याच्या कामाला व्यत्यय येत असल्याने शेतकरी सर्रास तणनाशकाचा वापर करत असल्याचे दिसत आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागात या भिज पावसाने रस्त्यांचे तीनतेरा वाजले असून रस्त्यावर चालणे नागरिकांना मुश्किल झाले आहे. रस्त्यावर चिखलामुळे दळणवळण थंडावले आहे. त्यामुळे दुग्ध व्यावसायिक आणि विद्यार्थी यांच खराब रस्त्यामुळे अडचण तयार झाली आहे. सध्या पाऊस कायम राहणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. खरीप पिकांसाठी हा पाऊस अत्यंत महत्वाचा ठरत आहे. पाऊस होत असल्याने पिकांच्या पाण्याची काळजी मिटली आहे. सध्या रिमझिम स्वरुपात पाऊस होत आहे. मोठ्या पाऊस अजून झालेला नाही. पिकांच्या चांगल्या वाढीच्या दृष्टीने शेतकरी मोठ्या पावसाची प्रतिक्षा करत आहेत. दरम्यान, मागील दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. शुक्रवारी देखील अनेक ठिकाणी पाऊस झाला. पिकांसाठी हा पाऊस अत्यंत महत्वाचा ठरला आहे. पाण्याअभावी सुकत चाललेल्या पिकांना या पावसाने मोठा दिलासा दिला आहे. भिजपावसाने रस्ते खराब, वाहनचालकांना मनस्ताप तालुक्याच्या ग्रामीण भागात या भिज पावसाने रस्त्यांचे तीनतेरा वाजले असून रस्त्यावर चालणे नागरिकांना मुश्किल झाले आहे. रस्त्यावर चिखलामुळे दळणवळण थंडावले आहे. त्यामुळे दुग्ध व्यावसायिक आणि विद्यार्थी यांच खराब रस्त्यामुळे अडचण तयार झाली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *