![]()
मंगळवेढा येथे नियोजित जगद्गुरु महात्मा बसवेश्वर यांच्या स्मारकासाठी प्रशासनाकडून १५ एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या जागेवर भव्य स्मारक आणि तलाव सुशोभीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने निधीची मागणी करावी, अशा सूचना सोलापूरचे पालकमंत
.
मंगळवेढा शहरात संत चोखामेळा स्मारकासाठी किमान दोन एकरपेक्षा अधिक जागा उपलब्ध करून देण्याबाबतही पालकमंत्र्यांनी सकारात्मक पाऊल उचलले आहे. अशा जागेची प्रत्यक्ष पाहणी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व स्थानिक आमदारांनी करावी, असे आदेश गोरे यांनी प्रशासनाला दिले आहेत. या महत्त्वाच्या आढावा बैठकीला आमदार समाधान आवताडे, भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, जिल्हाधिकारी कार्तिकियेन एस., मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्यासह मंगळवेढा प्रांत अधिकारी बी. आर. माळी व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
अरण येथील संत शिरोमणी श्री सावता महाराज यांच्या स्मारकासाठी राज्य शासनाने १५० कोटींचा निधी मंजूर केला आहे. यापैकी ८९ कोटींच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली असून, प्रशासनाने याची टेंडर प्रक्रिया तातडीने सुरू करावी, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. तसेच मंदिराचे डिझाईन पुढील आठ दिवसांत अंतिम करण्याचे आदेशही त्यांनी दिले. मंगळवेढा ही संतांची भूमी आहे. बसवेश्वर आणि चोखामेळा या दोन्ही महापुरुषांच्या स्मारकांमुळे शहराच्या वैभवात भर पडणार आहे. पालकमंत्र्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले हे प्रश्न आता मार्गी लागताना दिसत आहेत. बसवेश्वर स्मारकासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व आवश्यक परवानग्या दिल्या आहेत. आर्किटेक्चरकडून स्मारकाचा आराखडा (प्लॅन) तयार करून मागविण्यात येणार आहे. प्लॅन अंतिम होताच निविदा (टेंडर) काढली जाईल. ^बसवेश्वर स्मारकासंदर्भात जागा निश्चिती झाली असून जिल्हाधिकारी यांनी सर्व परवानग्या दिल्या आहेत. चोखामेळा स्मारकासंदर्भात पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मंगळवेढ्यात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करण्याच्या सूचना केल्या आहेत. शशिकांत चव्हाण, जिल्हाध्यक्ष, भाजपा
प्रक्रिया प्रगतीपथावर
पाहणी करण्याच्या सूचना