Headlines

बिबट्याच्या दहशतीचे झाले ‘रसवंतीगृह’:आळेफाटा परिसरात हटके व्यवसायाची चर्चा‎




आळेफाटा व्यवसायाला नाव देताना अनेकदा देव किंवा कुटुंबीयांच्या नावाचा आधार घेतला जातो. मात्र, जुन्नर-आंबेगाव पट्ट्यातील बिबट्याच्या दहशतीलाच एका कल्पक व्यावसायिकाने आपल्या व्यवसायाची ओळख बनवले आहे. आळेफाटा-शिरूर मार्गावर सुरू झालेल्या ‘बिबट्या रसवंतीगृह’ या नावाने सध्या संपूर्ण परिसरात मोठी उत्सुकता निर्माण केली असून, उसाच्या रसासोबतच या नावाची गोडीही चर्चिली जात आहे. जुन्नर, आंबेगाव, शिरूर आणि पारनेर या तालुक्यांमध्ये बिबट्याची समस्या गंभीर आहे. बिबट्याच्या हालचाली आणि हल्ल्यांच्या बातम्यांमुळे या परिसरात भीतीचे वातावरण असते. याच वास्तवाला विनोदी आणि आकर्षक पद्धतीने मांडत या व्यावसायिकाने आपल्या रसवंतीगृहाला ‘बिबट्या’ असे नाव दिले आहे. हे नाव केवळ गंमत नसून परिसराच्या ओळखीचे प्रतीक बनले आहे. रस्त्यावरून जाणारा प्रत्येक प्रवासी या नावाकडे पाहून काही क्षण थबकतो. अनेक जण थांबून फलकासोबत फोटो काढतात आणि “असं नाव कसं सुचलं?” असा प्रश्न विचारतात. नावातील या वेगळेपणामुळे ग्राहकांची पावले आपसूकच रसवंतीगृहाकडे वळत असून सोशल मीडियावरही याचे फोटो व्हायरल होत आहेत. आळेफाटा-शिरूर रस्त्यावर असलेले बिबट्या रसवंती गृह. छाया : सुरेश भुजबळ



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *