![]()
भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने वर्षावासाला प्रारंभ झाला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन अशोक वाटिकेत भंते राजज्योती यांच्या हस्ते संपन्न झाले आहे. आपल्या प्रवचनात भंते राजज्योती यांनी “विश्वगुरू तथागत भगवान गौतम बुद्ध’ या विषयावर प्रवचन केले. आपल्या प्रवचनांमधून तथागत बुद्ध जगाचे मार्गदाते आहेत. संपूर्ण जगाला बुद्धाची गरज आहे, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष पी. जे. वानखडे, जिल्ह्याचे सरचिटणीस नंदकुमार डोंगरे, महिला अध्यक्ष इंदू मेश्राम उपस्थित होत्या. वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आषाढी पौर्णिमेपासून ते अश्विन पौर्णिमेपर्यंत वर्षावासानिमित्त भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने प्रवचन मालिकेला सुरवात झाली आहे. या प्रवचन मालिकेत विविध विषयांवर तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवन संबंधित विविध विषयांवर केंद्रीय शिक्षक, शिक्षिका मार्गदर्शन करणार आहेत. आपल्या प्रवचनात पूज्य भंते राजज्योती यांनी विश्वगुरू तथागत भगवान गौतम बुद्ध या विषयावर प्रवचन केले. आपल्या प्रवचनांमधून तथागत बुद्ध जगाचे मार्गदाते आहेत. संपूर्ण जगाला बुद्धाची गरज आहे असे सांगितले. प्रास्ताविक संस्कार विभागाचे प्रमुख डी. एस. ननिर यांनी केले. आभार महिला सरचिटणीस प्रज्ञा इंगळे यांनी मानले. या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्ह्याचे पदाधिकारी, महानगर पूर्व आणि पश्चिमचे सर्व पदाधिकारी, जिल्हा महिला आणि महानगर संपूर्ण पदाधिकारी, केंद्रीय शिक्षक, शिक्षिका, बौद्धाचार्य, बौद्ध उपासक, उपासिका उपस्थित होते, असे जिल्ह्याचे प्रचार, प्रसार सचिव संजय गवई यांनी कळवले आहे. बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार सगळीकडे व्हावा म्हणून भिक्खू संघ सगळीकडे मार्गक्रमण करत असत. मात्र पावसाळ्यामुळे भिक्षू संघाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे शक्य होत नसे. नदीला पूर असल्यामुळे कित्येक भिक्षूंना आपला प्राण गमवावे लागत असे. पावसाळ्यात विविध आजारांचा सामना त्यांना करावा लागत होते. त्यामुळे पावसाळ्यामध्ये भिक्षूंनी आपल्या जवळील विहारामध्ये धम्माचे अधिक ज्ञान, अधिक अभ्यास करावा आणि येणाऱ्या श्रद्धावानांना धम्माचे यथोचित मार्गदर्शन करावे जेणेकरून त्यांचे जीवन सुखकर होईल. वर्षावास हा तथागत भगवान गौतम बुद्धांच्या काळापासून आतापर्यंत अव्याहतपणे चालू आहे.
Source link
बुद्ध मार्गदाता, म्हणून संपूर्ण जगाला आज बुद्धाची गरज- भंते राजज्योती:भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवन कार्यावर हाेणार मंथन